'मंदिरे बंद उघडले बार, उध्दवा धुंद तुझे सरकार'; उपरोधिक भजन गात आंदोलन

agitation to open temple in trimbakeswar nashik marathi news
agitation to open temple in trimbakeswar nashik marathi news

नाशिक : (त्रंबकेश्वर) सात महिने होत आले तरीही महाराष्ट्रातील सर्व मंदिरे बंद असल्याने भाविकांची श्रध्दा व शक्ती स्थाने बंदमुळे विपरीत परिणाम होत असुन उर्जादेणाऱ्या स्थानास बंदी व मदिरा-बारला परवानगी हा कुठला रोगावर उपचार होत आहे असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

त्रंबकेश्वर नगरीची अर्थव्यवस्थाच ह्या मंदिरावर अवलंबुन आहे. मंदिर बंद अल्याने  नागरिक सर्वदृष्टया मेटाकुटीला आले असताना महाराष्ट्र सरकार या‌ बाबद निश्चित धोरण स्विकारत नसल्याने तसेच नगरवासीयांच्या जीवन मरणाचा प्रश्न सोडवित नसल्याच्या निषेधार्थ त्रंबकेश्वर मंदिरा समोर हा.ज.पा. तर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत हे उपोषण करण्यात आले.

या उपेषणात जिल्हा पदाधिकारी बच्छाव, अँड.श्रीकांत गायधनी, तालुकाध्यक्ष विष्णु दोबाडे, सुयोग वाडेकर, विराट मुळे अखिल भारतीय षडदर्शन आखाड्याचे प्रमुख सागरानंद सरस्वती, महंत शंकरानंद व गिरीजानंद सरस्वती जुना आखाड्याचे ठाणापती यासह नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, नगरसेवक श्याम गंगापुत्र, पुरोहित संघाचे विश्वस्त प्रशांत गायधनी, तृप्ती कारणे, संजय कुलकर्णी असे पदाधिकारी यात सहभागी झाले होते. येथील मंदिरे तात्काळ उघडावीत व दर्शन व पुजेसाठी आरोग्य दक्षतेच्या अटी व नियमांची अमंलबजावनी करावी असे सागरानंद सरस्वती यांनी सुचित केले.जिल्हा पदाधिकारी येण्या पर्यंत या लाक्षणिक उपोषणात सहभागी होणारे पदाधिकारी वाट पहात बसल्याचे दिसत होते. तर स्थानिक पालिकेत भाजपची सत्ता असुनही प्रत्येकवेळी संख्याकमी असल्याने हेवेदावे जोरदार असल्याचे लक्षात येत होते.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com