एमआयएमच्या आमदाराकडूनच घरचा आहेर....ओवेसींनी मालेगावला केलेल्या मदतीवरून म्हणाले...

mufti and ovesi.jpg
mufti and ovesi.jpg

नाशिक / मालेगाव : मालेगाव शहर महाराष्ट्रातील कोरोनाचे हॉटस्पॉट. राजकारण्यांच्या दृष्टिने ब्लॅक स्पॉट. या शहराने कोरोनातही माणुसकी जपली. स्थानिक स्तरावर अनेक मंडळी पक्ष, धर्म, प्रदेश विसरून एकमेकांच्या मदतीला आले. पण मालेगावला पहिल्यांदाच एमआयएमचे नेते खासदार असदुद्दिन ओवेसी एक ट्रकभर धान्य मदत पाठविली. त्यावर एमआयएमच्या आमदारांनीच घरचा आहेर दिला आहे.

"शहराच्या दृष्टीने ती मदत फार लक्षणीय नाही"

कोरोना संसर्गामुळे केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशभर चर्चेत असलेल्या मालेगावला पहिल्यांदाच एमआयएमचे नेते खासदार असदुद्दिन ओवेसी एक ट्रकभर धान्य मदत पाठविली. आजवर कॉंग्रेससह विविध स्थानिक पक्षाच्या नेत्यांनी मदत केली. ही मालेगावच्या नागरिकांसाठी राजकीय पक्षांकडून आलेली पहिली मदत आहे. शहराच्या दृष्टीने ती फार लक्षणीय नाही. त्यामुळे मालेगावच्या दृष्टीने ती उंट के मुँह में जिरा आहे. मात्र इतर कोणीच काही पाठविले नाही, त्यात ओवैसी यांनी आठवण ठेवली हे देखील कमी नाही हे समाधान ठरले. कोरोनाचा संसर्ग व लॉकडाउनमुळे शहरातील यंत्रमाग व्यवसाय ठप्प झाला आहे. कामगारांना आता रोजगार अन्‌ भाकरीची चिंता आहे. साठ टक्‍क्‍यांहून अधिक दारिद्रयरेषेखालील नागरिकांना मदतीची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत एमआयएमचे सर्वोच्च नेते खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी शहरासाठी ट्रकमधून दोन हजार किट साहित्य पाठविले आहे.  शहरात आलेल्या मदतीच्या ट्रकचे स्वागत झाले. मदत तोकडी आहे. मात्र, मजलिसने मदत तर केली, असे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माइल यांनी सांगितले. 

मालेगाव शहरात कॉंग्रेस विरुद्ध एमआयएम राजकारण

या मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मालेगाव शहराविषयी नकारात्मक प्रतिक्रीया व्यक्त करीत अशा स्थितीतही एखाद्या व्यक्तीची राजकीय मानसिकता काय असु शकते हे दाखवून दिले. त्यावर नागरीकांच्या अतिशय तीव्र प्रतिक्रीया व्यक्त झाल्या. या विषयावर विरोधी पक्षाकडून व्यक्त झालेल्या प्रतिक्रीयांविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यात मालेगाव शहरात कॉंग्रेस विरुद्ध एमआयएम असे राजकारण रंगले आहे. या पार्श्‍वभूमीवर ही मदत, त्यावरील वक्तव्य दोन्हीही आले. त्यामुळेच स्वपक्षाच्या आमदाराकडूनच खासदार ओवेसी यांच्याविषयी उर्दूतील प्रचलीत म्हण सांगून त्यांनी हा घरचा आहेर दिला, अन्‌ मदत स्विकारली देखील. 

मदत नेमकी कोणाला वाटप करायची,
ओवेसी शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आम्ही आमच्या परीने मदत करीत असल्याचे सांगितले. शहरातील कार्यकर्त्यांच्या मदतीने गरजूंना या किटचे वाटप करण्यात येणार आहे. किटमध्ये एक आठवडा पुरेल एवढी साधनसामग्री आहे. दरम्यान, खासदार ओवेसी यांनी स्वत: मदत पाठविली. याबद्दल आमदार मौलाना मुफ्ती यांनी समाधान व्यक्त केले. मदत नेमकी कोणाला वाटप करायची, हा बिकट प्रश्‍न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com