कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी विपश्यना केंद्राची सर्व शिबिरं रद्द..

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 10 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील इगतपुरी विपश्यना केंद्रातील उद्यापासूनचे सर्व शिबिरं रद्द होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान विदेशी नागरिकांना डिसेंबर 2020 पर्यंत इगतपुरी केंद्रात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. उद्यापासून (ता.११) इगतपुरी केंद्रात शिबीर सुरु होणार होतं. यासाठी जवळपास 600 साधक येणार होते.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील इगतपुरी विपश्यना केंद्रातील उद्यापासूनचे सर्व शिबिरं रद्द होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान विदेशी नागरिकांना डिसेंबर 2020 पर्यंत इगतपुरी केंद्रात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. उद्यापासून (ता.११) इगतपुरी केंद्रात शिबीर सुरु होणार होतं. यासाठी जवळपास 600 साधक येणार होते. दरम्यान, नाशिकच्या कोरोना कक्षात दाखल होणारे पाचही रुग्णांचे कोरोनाचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. या रुग्णाचे स्वॉब नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. 

भारतात आणखी 2 राज्यांमध्ये पोहोचला व्हायरस

भारतात कोरोनाव्हायरसचा धोका वाढला असून आणखी 2 राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आलेत. कर्नाटक आणि पंजाबमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या आता 45 वर पोहोचली आहे. कर्नाटकच्या बंगळुरूत एका आयटी इंजिनीअरला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. कर्नाटकातील हा पहिला रुग्ण आहे.तर पंजाबमध्येही कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण इटलीहून भारतात परतला आहे. पंजाबचे मुख्य सचिव (आरोग्य) अनुराग अग्रवाल यांनी सांगितलं की, 'एअर इंडियाच्या विमानानं हा कोरोनाग्रस्त रुग्ण इटलीच्या मिलानहून भारतात आला. कुटुंबातील अन्य 2 व्यक्तींसह हा रुग्ण 4 मार्चला अमृतसर विमानतळावर पोहोचला. तपासणीत त्याला कोरोनाव्हायरस असल्याचं स्पष्ट झालं.

हेही वाचा > लग्न जमण्याच्या आधीच 'दोघांना' भेटणं पडलं चांगलच महागात...! 

हेही वाचा >  भयानक प्रकार! हुंडा दिला नाही म्हणून डोक्यात घातला लाकडी दांडका..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All camps of Igatpuri Vipassana center canceled due to Corona virus Nashik Marathi News