इथले शेतकरी म्हणताएत " कोणी डॉक्‍टर देता का डॉक्‍टर'?

farmer 3.jpg
farmer 3.jpg

नाशिक : कळवण तालुक्‍यातील पुनंद खोऱ्यात अज्ञात रोगाची लागण होऊन अनेक म्हशींची पारडे मृत्युमुखी पडली आहेत. मोकभणगी, देसराणे येथील शासकीय पशुवैद्यकीय केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने "डॉक्‍टर देता डॉक्‍टर' असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लवकरात लवकर डॉक्‍टरची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी केली आहे. 

कळवण तालुक्‍यात पशुधन संकटात

कळवण पंचायत समितींतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या 14 केंद्रांपैकी सहा केंद्रांत पशुवैद्यकीय अधिकारी ही पदे रिक्त आहेत. यात कळवण, ओतूर, अभोणा, देसराणे, नांदुरी, कनाशी, मोकभणगी, दळवट, उंबरगव्हाण, बापखेडा येथे श्रेणी- एक, तर पाळे, बुद्रुक, नवी बेज, जयदर, देवळीवणी येथे श्रेणी- दोन अशी 14 पदे आहेत. देसराणे, दळवट, मोकभणगी, नांदुरी, अभोणा व उंबरगव्हाण येथील श्रेणी एकची सहा पदे रिक्त आहेत. श्रेणी एकच्या प्रत्येक दवाखान्याला पाच ते सहा गावे जोडली आहेत. पुनंद खोऱ्यातील देसराणे व मोकभणगी येथील दवाखान्यात दीड वर्षापासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुधन संकटात सापडले आहे. 

अहो आश्‍चर्यम्‌! शिपायाकडून जनावरांवर उपचार ​

देसराणे, रवळजी, मोकभणगी परिसरात अज्ञात रोगाची लागण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अज्ञात रोगामुळे परिसरातील एक ते दहा महिने वय असलेली सात ते आठ म्हशींची पारडे दगावली आहेत. येथील पशुवैद्यकीय केंद्रात डॉक्‍टर नसल्याने शिपाई तपासणी करून उपचार करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनाही पशुधन वाचविण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करीत खासगी डॉक्‍टरांकडे उपचार घ्यावे लागत आहेत. मागणी करूनही कायमस्वरूपी डॉक्‍टर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची सहा पदे रिक्त 
आमच्या म्हशीचे दहा महिन्यांचे पारडू आजारी होते. देसराणे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधला असता, डॉक्‍टर नसल्याने त्याला उपचार मिळू शकले नाहीत आणि ते दगावले. परिसरातील सहा ते आठ ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. अज्ञात रोगाची साथ असल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मृत पारडाचे विच्छेदन होणे गरजेचे आहे जेणेकरून दुग्धव्यवसाय करणाऱ्यांना याचा फटका बसणार नाही. -बबन वाघ, शेतकरी, रवळजी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com