
केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (ता. ७) मुंबई येथे पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रस्तेबांधणी प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यात प्रामुख्याने सुरत-नाशिक-नगर-चेन्नई अशा ग्रीन फील्ड महामार्गाचाही समावेश आहे.
वडनेरभैरव (जि. नाशिक) : केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (ता. ७) मुंबई येथे पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रस्तेबांधणी प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यात प्रामुख्याने सुरत-नाशिक-नगर-चेन्नई अशा ग्रीन फील्ड महामार्गाचाही समावेश आहे.
सुरत-नाशिक-चेन्नई ग्रीन फील्ड महामार्गाला मंजुरी
यामुळे उत्तरेकडील वाहनांचा लोंढा मुंबईला न जाता दक्षिणेला जाईल आणि उत्तर-दक्षिणेकडील जिल्ह्यांची वाहतूक वेगाने होण्यास मदत मिळेल. तसेच या महामार्गामुळे सुरगाणा, पेठ, दिंडोरी, निफाड या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील बहुतांश आदिवासी पट्ट्याचाही विकास होण्यास मदत होईल. मोठ्या प्रमाणावर रोजगार तर उपलब्ध होईलच, शिवाय कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकरी, व्यापारी यांनाही मोठा फायदा होणार आहे, असे खासदार डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ
हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच