video : ऐका हो ऐका...'एटीएम व्हॅनमधून नाशिककरांना मिळणार घरपोच दुध!'...कसं ते तुम्हीच वाचा

milk ATM.jpg
milk ATM.jpg

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या मनात प्रचंड भीती वाढत आहे. संचारबंदीत जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीत शहरात एटीएमद्वारे दूध थेट ग्राहकांच्या दारात पोचवत आहेत. शहरात हरीश जैन यांनी हे सकारात्मक पाऊल उचलले असून, त्याला नाशिककरांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. कुठलीही बाहेरील वस्तू घरात आणण्यापूर्वी प्रत्येक जण योग्य काळजी घेण्यासाठी आग्रह धरला जात असताना, दुधाचे एटीएम घराघरात प्रवेश मिळवीत आहे. 

एटीएम व्हॅन नागरिकांना घरपोच दुधाची सेवा

मुंबई, पुणे शहरांच्या तुलनेत नाशिकला कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असली, तरी नागरिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत आहेत. मात्र जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करण्यासाठी अनेकदा नागरिकांना घराबाहेर पडावे लागत आहे. बाहेरून आणलेली वस्तू कोरोना संक्रमित तर नसेल ना असे एक ना अनेक प्रश्‍न अनेकांना पडत आहेत. अशात रोजच्या दुधाबाबत अनेकांना प्रश्‍न पडतात. यावर पर्याय म्हणून नाशिकच्या जीवनधारा कंपनीमार्फत मिल्क एटीएम व्हॅनची निर्मिती करण्यात आली आहे. संचारबंदीत रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी ही मिल्क एटीएम व्हॅन नागरिकांना घरपोच दुधाची सेवा देत आहे. विशेष म्हणजे या मिल्क एटीएममध्ये पैसे टाकल्यावर मानवी स्पर्श न होता गायीचे किंवा म्हशीचे दूध ग्राहकांच्या भांड्यात मिळत आहे. 

काठे गल्ली, हिरावाडी, पंचवटी, नाशिक रोडला दुधाची विक्री

संचारबंदीमुळे अनेक शेतकऱ्यांचे दूध शहरापर्यंत पोचू शकत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. अशातच ओझर येथील प्रथमेश एंटरप्राइजेसचे हरीश जैन यांनी नाशिक शहरातील वॉटर एटीएमच्या धर्तीवर शेतकऱ्यांकडील दूध खरेदी करून मिल्क एटीएम व्हॅन सुरू केली आहे. सध्या या व्हॅनद्वारे काठे गल्ली, हिरावाडी, पंचवटी, नाशिक रोडला दुधाची विक्री केली जात आहे. गायीचे दूध 40 रुपये, तर म्हशीचे 55 रुपये लिटरप्रमाणे उपलब्ध आहे. या एटीएममध्ये पैसे किंवा एटीएम कार्ड टाकल्यास दूध भांड्यात पडते. 

बाजारभावापेक्षा कमी किमतीत ग्राहकांना घरपोच दूध उपलब्ध करून दिले जात असल्याने ग्राहकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या शहरात एटीएमद्वारे 800 ते 1000 लिटर दुधाची विक्री केली जात आहे. - हरीश जैन, संचालक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com