esakal | नाशिक शहरात बार सुरू; रात्री ९ वाजेपर्यंत परवानगी - भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan b.jpg

सुशांतसिंग राजपूत प्रकरण मिटत आहे त्यामुळे राज्यात दुसरं प्रकरण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेत सर्वांनीच विचारपूर्वक बोललं पाहिजे. मराठा ओबीसी भांडणं लावण आता थांबवायला पाहिजे.

नाशिक शहरात बार सुरू; रात्री ९ वाजेपर्यंत परवानगी - भुजबळ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : रविवार (ता. 11) पासून नाशिक शहरात बार सुरू करण्याला परवानगी देण्यात आली असली तरी, सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंतच बार सुरू राहतील. पण इतर दुकान आणि हॉटेल मात्र सकाळी ८ ते रात्री आठपर्यंत सुरू राहतील. बारला सकाळी आठला परवानगी नसेल असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. 10) रोजी केले. 

राज्यातील वातावरण बिघडवू नका

सुशांतसिंग राजपूत प्रकरण मिटत आहे त्यामुळे राज्यात दुसरं प्रकरण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेत सर्वांनीच विचारपूर्वक बोललं पाहिजे. मराठा ओबीसी भांडणं लावण आता थांबवायला पाहिजे. त्यावर बरीच चर्चा झालीय असेही पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले. नाशिकला पाणी नियोजन आणि कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. श्री भुजबळ म्हणाले, कुठलाही एक निर्णय घेताना त्यांचा इतर समाजावर काय परिणाम होणार याचा विचार करायला हवा. त्यामुळे उगाचच वातावरण पेटते ठेवणारे बोलणे टाळले पाहिजे. तलवारी नाही पण शब्दांची खणखणी झाली आहे ती थांबायला पाहिजे. 

हेही वाचा >  पाकिस्तानला खबरी देणाऱ्या दीपक शिरसाठचा उद्योग HAL ला पडणार महागात! सुरक्षेला मोठे आव्हान

मराठा-ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने आरक्षण झालेच पाहिजे असे काहींचे प्रयत्न आहे तर काहींचे मात्र राजकारण मात्र सुरू आहे. खासदार संभाजी राजे यांच्या वक्तव्यांविषयी ते म्हणाले की, राजे सर्व जनतेचे असतात, त्यांनी सर्वांचा विचार करायला पाहिजे असे वडेट्टीवार बोलले होते. वडेट्टीवार हे त्या खात्याचे मंत्री आहे त्यामुळे ते बोलणारच असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा > दुर्दैवी : सलग चार वर्षे द्राक्षाचे उत्पन्नच नाही; बेपत्ता शेतकऱ्याच्या आत्महत्येचा खुलासा