
नाशिक : नाशिकसह महाराष्ट्रात बहुराष्ट्रीय मोबाईल कंपन्यांचे शोरूम फोडायचे. त्यातील लाखो रुपयांचे मोबाईल नेपाळ, बांगलादेशमध्ये विकायचे अशा गुन्हे प्रकरणातील बिहारमधील कुख्यात चादर गॅंगचा नाशिक पोलिसांनी पदार्फाश केला. पोलिसांनी आतापर्यंत चादर गॅंगकडून 24 लाखांचा ऐवज हस्तगत केला. घोडसाहन (जि. मोतीहारा, बिहार) येथील अजयकुमार सहा या सूत्रधारासह सात संशयितांचा माग काढून एका संशयिताच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. नाशिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली. वर्षभरात 19 गुन्ह्यांत 27 लाख 96 हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. एका गुन्ह्यात बिहारमध्ये तळ ठोकून गुन्हा उघडकीस आणला. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी ही माहिती बुधवारी (ता. 15) पत्रकार परिषदेत दिली. उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले-श्रींगी आदी उपस्थित होते.
नाशिकमध्ये चोरी करायची अन् विक्री नेपाळ, बांगलादेशात
चादर गॅंग टोळीची मोडस ऑपरेंडी पोलिसांच्या तपासातून पुढे आली. रात्री शोरूमसमोर चादरीचा आसरा घ्यायचा. शोरूम फोडल्यानंतर मागून धूम ठोकायची. नाशिकमधील गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ऍपल कंपनीचे शोरूम फोडून त्यातील 82 मोबाईल, 17 ऍपल कंपनीची घड्याळे असा 73 लाख 46 हजारांचा ऐवज लंपास केला होता. विविध भागांत शोरूम फोडून लंपास केलेले मोबाईल टोळीतील समीर ऊर्फ सेलुवा मुस्तफा, दिवाण, सलमान ऊर्फ बेलुवा मुस्तफा दिवाण, रियाज ऊर्फ कैमुद्दीन मिया, नईम ऊर्फ मुन्ना दिवाण, नसरुद्दीन बेचल मिया, मुस्लिम तय्यब मिया हे संशयित नेपाळ आणि बांगलादेशात विकायचे.
नाशिक पोलिसांची कामगिरी
(गुन्हे शाखेला आलेले वर्षभरातील यश)
गुन्हे संख्या संशयित अटक मुद्देमाल हस्तगत
घरफोड्या 9 6 9 लाख 53 हजार
चेन स्नॅचिंग 4 4 2 लाख 10 हजार
वाहनचोरी 5 9 12 लाख 10 हजार
इतर चोऱ्या 1 1 3 लाख 51 हजार
एकूण गुन्हे 19 20 27 लाख 20 हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.