VIDEO : भाजपा महिला मोर्चाचे पंचवटीत आक्रोश आंदोलन; आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

दत्ता जाधव
Monday, 12 October 2020

राज्यात महिलांवर अत्याचारात वाढ होत असून सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत भाजपतर्फे शहराच्या विविध भागात आक्रोश आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार पंचवटी कारंजावर हे आंदोलन छेडण्यात आले.

नाशिक : (पंचवटी) राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, बालिकांवर होणारे बलात्कार, कोवीड सेंटरमध्ये महिलांवर होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात राज्य सरकारला जागे करण्यासाठी शहराच्या विविध भागात आंदोलन छेडण्यात आले. पंचवटी कारंजावर आज सोमवारी (ता. 12) सकाळी भाजपा महिला मोर्चाने आक्रोश आंदोलन केले. विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. 

शहराच्या विविध भागात आक्रोश आंदोलनाची हाक

राज्यात महिलांवर अत्याचारात वाढ होत असून सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत भाजपतर्फे शहराच्या विविध भागात आक्रोश आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार पंचवटी कारंजावर हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी सरकारचा धिक्कार असो, राज्य सरकार करतय काय? खाली डोकं वरती पाय, जय भवानी-जय शिवाजी, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनात भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार प्रा. देवयानी फरांदे भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, महिला मोर्चा अध्यक्ष हिमगौरी आडके, संध्या कुलकर्णी, रोहिणी नायडू, सुनील बागुल, प्रशांत जाधव, सुनील केदार, पवन भगुरकर, जगन पाटील, अमित घुगे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग 

पंचवटी कारंजा येथे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. तसेच आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पंचवटी कारंजा येथील आंदोलनात चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्ञानेश्वर काकड, गणेश गीते, रंजना भानसी, जगदीश पाटील, प्रियंका माने, अरुण पवार, सुरेश खेताडे, पुनम धनगर, दिगंबर धुमाळ, धनंजय माने, मनीष बागुल, विजय बनछोडे, ऋषिकेश आहेर, अनिल वाघ, उत्तम उगले, अंजली अभंगराव, वर्षा खांबेकर, हर्षद वाघ, सविता कुलकर्णी, लता राऊत, रोहिणी दळवी, क्षितिजा खटावकर, प्रीती उपाध्याय, मंजुषा लोहगावकर, प्रवीण भाटे, मयुर नाटकर, शोभा जाधव, करुणा गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता. 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Mahila Morcha Outrage movement in Panchavati nashik marathi news