"शिवसेना व एमआयएमची ई-भुमीपुजनाची मागणी मान्य नाही" - देवेंद्र फडणवीस

विक्रांत मते
Monday, 3 August 2020

पाच ऑगष्टला अयोध्येत होणाया राम मंदीर शिलान्यासाच्या पुजनावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चिमटा काढताना एमआयएमच्या रांगेत बसविले. या दोन्ही पक्षांव्यतिरिक्त ई-पुजनाची मागणी कोणी केली नाही

नाशिक - पाच ऑगष्टला अयोध्येत होणाया राम मंदीर शिलान्यासाच्या पुजनावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चिमटा काढताना एमआयएमच्या रांगेत बसविले. या दोन्ही पक्षांव्यतिरिक्त ई-पुजनाची मागणी कोणी केली नाही. भाजपचा देखील ई-पुजनाला विरोध असून कोरोनामुळे सर्वांनाचे पुजनाला जाता येत नाही परंतू पंतप्रधान सर्वांचे प्रतिनिधी म्हणून भुमिपूजन करतं असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिवसेना व एमआयएम च्या ई-भुमीपुजनाला भाजपचा विरोध 

फडणवीस धुळे येथून मुंबईला जात असताना हॉटेल एक्सप्रेस ईन येथे काही काळ थांबले होते त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला ते म्हणाले, मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात सर्व कार सेवेत मी उपस्थित होते त्यामुळे मंदीर उभे राहतं असताना उपस्थित राहता आले असते तर आनंद झाला असता परंतू कोरोनामुळे भूमी पूजनाचे निमंत्रण कोणालाच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून भूमिपूजन करत आहे. अयोध्येत मंदीराचे स्वप्न पुर्ण होत असल्याने आम्ही आनंदी आहोत. राम मंदीराचे भुमिपूजन होत असताना राज्यातील सर्व मंदीर उघडली जावे अशी मागणी होत आहे. वाद निर्माण होवू नये म्हणून सरकारने यातून समन्वय काढावा. भुमिपूजनाचे निमंत्रण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आहे कि नाही याबाबत आपल्याला काही माहित नाही एमआयएम व शिवसेनेने ई-भुमिपुजनाची मागणी केली आहे. परंतू आम्हाला ई-भुमीपुजन अजिबात मान्य नसल्याचे सांगताना शिवसेनेला श्री. फडणवीस यांनी चिमटा काढला. 

रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - ज्योती देवरे

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP opposes Shiv Sena and MIM's e-bhumi pujan said by devendra fadnavis nashik marathi news