लॉकडाऊनमध्येही 'या' शाळेचा पालकांकडे पुस्तक विक्री अन् शैक्षणिक शुल्कासाठी तगादा सुरूच..अन् मग

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 24 April 2020

कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कासाठी पालकांकडे किमान तीन महिन्यांपर्यंत तगादा लावू नये, असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. तरीही नाशिकच्या एका शाळेने शैक्षणिक साहित्य विक्री सुरू केल्याची तक्रार शिवसेनेचे विभागप्रमुख आणि पालक नीलेश साळुंखे यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे ईमेलद्वारे रीतसर दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही याची दखल घेत संबंधित विभागाकडे चौकशीसाठी तक्रार अर्ज पाठविला आहे. 

नाशिक / इंदिरानगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण भारतात सर्व शैक्षणिक संस्था बंद असताना येथील नाशिक केंब्रिज या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने पुढील वर्षाची पुस्तके, वह्या आदी सामग्री विक्रीसाठी खुली केली असून, पालकांना त्याबाबत कळविले आहे. या प्रकरणी नाशिक शिक्षण मंडळाने शाळेला नोटीस पाठवून सात दिवसांच्या आत खुलासा मागविला आहे. 

शिक्षण मंडळाकडून केंब्रिज शाळेला नोटीस 
कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कासाठी पालकांकडे किमान तीन महिन्यांपर्यंत तगादा लावू नये, असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. तरीही नाशिक केंब्रिज शाळेने शैक्षणिक साहित्य विक्री सुरू केल्याची तक्रार शिवसेनेचे विभागप्रमुख आणि पालक नीलेश साळुंखे यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे ईमेलद्वारे रीतसर दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही याची दखल घेत संबंधित विभागाकडे चौकशीसाठी तक्रार अर्ज पाठविला आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! "पुढच्या जन्मी आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेऊ"..चिठ्ठीत कोरोनाची भीती अन्‌ नैराश्‍य ​

वह्या-पुस्तक विक्री सुरू केल्याची तक्रार 
शाळेच्या वर्गशिक्षकांनी तयार केलेल्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर पालकांना मेल आयडी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावर पुस्तक विक्रीच्या सूचना केल्या आहेत. काही विद्यार्थ्यांची फेरचाचणी घेण्यात येणार असून, त्याचेही वेळापत्रक संबंधित विद्यार्थ्यांना मेलद्वारे पाठविल्याचे समजते. ज्या पालकांनी या शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरले, त्यांच्याच पाल्यांना ईमेलद्वारे निकाल दिले असून, ज्या पालकांनी शुल्क भरलेले नाही त्यांना ते भरल्यानंतर निकाल मिळेल, असे सांगण्यात आले. इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांनी शालेय व्यवस्थापनाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेत संबंधित प्रकाराची माहिती घेतली आहे. 

हेही वाचा > एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या??? गूढ काय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From the Board of Education Notice to Cambridge School nashik marathi news