Lockdown : "इथे मजुरांवर उपासमारीची वेळ...अन् दुसरीकडे मालेगावात हॉटेलच्या पाठीमागे काळाबाजार"

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 29 May 2020

लॉकडाउनमुळे मजूर, कामगारांवर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. शासन स्वस्त धान्य पुरवठा करून त्यांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या काळातही महामार्गावरील हॉटेलच्या पाठीमागे काळाबाजार सुरू होता.

नाशिक / मालेगाव : लॉकडाउनमुळे मजूर, कामगारांवर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. शासन स्वस्त धान्य पुरवठा करून त्यांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या काळातही महामार्गावरील हॉटेलच्या पाठीमागे काळाबाजार सुरू होता.

काळाबाजार सुरूच; दोघांना अटक; दोन फरारी 

लॉकडाउनमुळे मजूर, कामगारांवर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. शासन स्वस्त धान्य पुरवठा करून त्यांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या काळातही स्वस्त धान्याचा काळाबाजार सुरूच आहे. येथील अपर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पोलिस पथकाने महामार्गावरील स्टार हॉटेलच्या पाठीमागे छापा टाकून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा 3 लाख 96 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. यात 60 गोणी रेशनचा तांदूळ 96 हजार रुपयांचा, तर 3 लाखांची पिकअपचा समावेश आहे.

हेही वाचा > धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी चालक मोहंमद युनूस याकुब (वय 46, रा. धुळे), नवीद आलम अमीन (35, हजारखोली, मालेगाव) या दोघांना अटक केली आहे. वाहन मालक इब्राहीम रशीद खाटीक व महेश नामक खरेदीदीर (दोघे रा. धुळे) फरारी झाले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर कोते, पोलिस शिपाई तुषार अहिरे, अभिजित साबळे, दिनेश शेरावते, पुरवठा निरीक्षक रणजित रामाघरे आदींनी शुक्रवारी (ता. 29) सकाळी अकराच्या सुमारास ही कारवाई केली. चौघांविरुद्ध जीवनावश्‍यक वस्तू काळाबाजार व साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  

हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा 'असा' दुर्देवी अंत...कुटुंबियांचा आक्रोश

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both arrested in scam of rations in malegaon nashik marathi news