zoom call.jpg
zoom call.jpg

सावधान! व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्ससाठी झूम ऍपचा वापर करताय? तर मग हे वाचाच

नाशिक : संचारबंदीत जाहीर कार्यक्रमावर असलेल्या बंदीमुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद वाढला आहे. राजकीय बैठक, शाळा, महाविद्यालयांत झूम ऍपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे. आर्थिक मंदीच्या काळात चीन झूम ऍपमार्फत कोट्यवधी रुपये कमावत आहे. झूम ऍप्लिकेशन वापरताना योग्य ती काळजी न घेतल्यास युजर्स ऑनलाइन कॉन्फरन्समध्ये धुमाकूळ घालू शकतात. 

झूम ऍप्लिकेशन चिनी ऍप असून,त्याचा वापर अधिक
झूम ऍपद्वारे प्रामुख्याने जे प्रेझेंटेशन देणार आहे त्यांचा कॅमेरा आणि व्हिडिओ तसेच ही कॉन्फरन्स कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरून घेत असल्यास स्क्रीन शेअर केल्यावर सहभागी झालेल्या सगळ्या मेंबरला दिसणे. कॉन्फरन्सिंगमध्ये एकाच वेळी जास्तीत जास्त किती जण सहभाग घेऊ शकतात, हे तपासणे. जर काही अडचणी येत असतील, तर त्यासंदर्भात प्रश्‍न विचारणे व एकाच वेळी सर्वजण बोलू शकणे. हे सॉफ्टवेअर मोफत अथवा कमी किमतीत उपलब्ध असणे हे तपासून ऑनलाइन कॉन्फरन्सिंग करणे आवश्‍यक आहे. 
इंटरनेटवरून बरेच जण शक्‍यतो सॉफ्टवेअर वापरायला लागतात व या सॉफ्टवेअरवरून काम होतं, ते सॉफ्टवेअर जास्तीत जास्त नागरिक वापरायला लागले आहेत. झूम ऍप्लिकेशन चिनी ऍप असून, त्याचा मालक चायनीज आहे, तो यामार्फत दिवसाला कोट्यवधी पैसे कमावत आहे. चीनमधील ऍप्लिकेशन व तसेच आयात होणारे प्रोडक्‍ट हे बंद करून जर भारतात सुरू केले तर भारतीय लोकांना मोठ्या प्रमाणात नफा उद्योगधंदे व बेरोजगारी कमी होण्यात मोठी मदत होईल. 

यासाठी काय खबरदारी घेणे आवश्‍यक आहे 
आपण ज्यांना बोलावणार आहोत ऑनलाइन वेब इव्हेंटसाठी त्यांचे व्हेरिफिकेशन करून घेणे आवश्‍यक असते. सगळ्यांसाठी जर खुला करण्यात आला असेल, तर इव्हेंट होस्ट करायच्या वेळेला सर्व राइट्‌स हे एडमिन जवळच राहणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून सायबर भामटे आले, तर ते तुमच्या इव्हेंटमध्ये कुठल्याही प्रकारे घाणेरडे प्रकार होण्यापासून वाचू शकतात व इव्हेंट चांगला राहू शकतो. इव्हेंट सुरू असताना माइक फक्त होस्ट करणाऱ्याचा सुरू असावा. 

सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचा घरी बसून अभ्यासातील गॅप भरून काढता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून सर्व विषयांचे, चांगल्या प्रकारचे, सोप्या भाषेतील व्हिडिओ लेक्‍चर्स ऑनलाइन घेतले जात आहेत. झूम ऍपचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सदेखील घेतल्या जात आहेत. - डॉ. माधुरी जावळे, प्राचार्या 

हेही वाचा >  BREAKING : मालेगावची परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष IAS अधिकाऱ्यांची नेमणूक..'हे' अधिकारी सांभाळणार जबाबदारी
इंटरनेटद्वारे देवाणघेवाण करताना आवश्‍यक वाटणारी सॉफ्टवेअर जर शत्रू देशांनी तयार केलेली असतील तर ते आपण वापरू नये. कुठलेही ऍप्लिकेशन वापरताना आपला डेटा जर त्यांच्याकडे सेव्ह होत असेल किंवा मॉनिटर होत असेल, तर तो सुरक्षित आहे की नाही व त्यांनी कुठली सुरक्षाप्रणाली त्यासाठी वापरली आहे हे आपल्याला माहीत असणे महत्त्वाचे आहे. ऍप्लिकेशनचा डेव्हलपर ती मला नकळत सुद्धा हे कर हे अतिशय मोठ्याप्रमाणे ऍप्लिकेशन वापरणाऱ्या लोकांवर डल्ला मारताना आपल्याला दिसतात. -तन्मय दीक्षित, सायबरतज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com