पतीने स्वत:च्या शरीरावर प्रियसीचा फोटो, जन्मतारीख गोंदवून पत्नीचा छळ; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

पतीने चक्क फेसबुक प्रोफाईलवरच प्रेयसी आणि त्याचे असे दोघांचे फोटो अपलोड केले. आणि ही बाब विवाहितेला समजली. त्या धक्क्यातून सावरत नाही तोच पतीने आणखी एक धक्कादायक कारनामा केला, काय घडले नेमके?

नाशिक : पतीने चक्क फेसबुक प्रोफाईलवरच प्रेयसी आणि त्याचे असे दोघांचे फोटो अपलोड केले. आणि ही बाब विवाहितेला समजली. त्या धक्क्यातून सावरत नाही तोच पतीने आणखी एक धक्कादायक कारनामा केला, काय घडले नेमके?

पतीने आपली फसवणूक केल्याचे पत्नीच्या लक्षात आले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता सासरी नांदत असताना पतीचे विविध मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले. याप्रकरणी विवाहितेने पतीला विचारणा केली असता पतीसह सासरच्यांनी कोणाशीही अनैतिक संबंध नसल्याचे भासवले. त्यानंतर पतीने चक्क प्रियसीचा फोटो आपल्या फेसबुक प्रोफाईलवर अपलोड केला, स्वत:च्या शरीरावर प्रियसीचा फोटो, जन्मतारीख गोंदवून घेत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे उघडकीस आले. त्यातूनच पतीने फसवणूक केल्याचे तिच्या लक्षात आले. याप्रकरणी पीडितेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

सासरच्यांविरुध्द तक्रार दाखल

सासरच्यांनी  या कालावधीत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. पतीच्या चुकांवर पांघरुन घालत सासू, सासरे व नणंदने पतीला दोन महिन्यांसाठी मुंबईला पाठवून दिले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला अपमानास्पद वागणूक दिली. तिला दोन दिवस उपाशीपोटी ठेवले. विवाहितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी फडोळमळा, सिडको येथील संशयित पती नितीन सुहास घेगडमल, सासू सुहास घेगडमल, सासरे शारदा सुहास घेगडमल, नणंद शितल सुहास घेगडमल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case filed against woman molestation nashik marathi news