''जातवैधता प्रमाणपत्र अवैधतेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार''

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

निर्णय प्रक्रियेतील जाहीर मसुद्यातील पक्षकार व तक्रारदार यांनी सादर केलेले दस्तऐवज हे सारखेच आहेत. सादर केलेली कागदपत्रे समितीने मान्य केली असतानाही तडकाफडकी निर्णय घेतल्याने हा निर्णय राजकीय दबावापोटी घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. 

नाशिक : (अस्वली स्टेशन) जातपडताळणी समितीने जातप्रमाणपत्र अवैध ठरविण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे घोटी खुर्द येथील सरपंच मंदाकिनी गोडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

उच्च न्यायालयात दाद मागणार 

श्रीमती गोडसे म्हणाल्या, की जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने वेळोवेळी मागविलेली कागदपत्रे सादर केली असून, समितीने ती मान्यही केली तरीही राजकीय द्वेषापोटी हा निर्णय घेण्यात आला असल्याचा संशय आहे. समितीने कोणते निकष लावून निर्णय घेतला आहे याविषयी संभ्रम आहे. निर्णय प्रक्रियेतील जाहीर मसुद्यातील पक्षकार व तक्रारदार यांनी सादर केलेले दस्तऐवज हे सारखेच आहेत. सादर केलेली कागदपत्रे समितीने मान्य केली असतानाही तडकाफडकी निर्णय घेतल्याने हा निर्णय राजकीय दबावापोटी घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. 

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ

कायद्यानुसार निवडणुकीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे योग्य आहेत, याबाबत खात्रीपूर्वक सखोल अभ्यास न करता त्रिसदस्यीय समितीने बेकायदा निकाल दिला आहे. याविषयी आम्ही पक्षकार मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. संबंधित तहसीलदार व तक्रारदार यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. - ऍड. अशोक आहिरे, पक्षकारांचे वकील  

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caste validity certificate against illegality Will appeal to the High Court nashik marathi news