धक्कादायक.. आईला तातडीने पैसे पाठवायचे म्हणाला..अन् वृध्दासोबत केली 'अशी' हातचलाखी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

दोंदे हे दुपारी आपल्या एका मित्रासमवेत रिक्षा थांब्याजवळील बाकडावर बसले होते. त्यावेळी तेथे ऍक्‍टीवा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या आईला तीन हजार रूपये तातडीने पाठवायचे असल्याने भावनिक होऊन त्यांच्याकडे मदत मागितली. बोलत असताना त्यांनी वृद्ध दोंदे यांचा विश्‍वास संपादन केला. आणि मग...

नाशिक : दोंदे हे दुपारी आपल्या एका मित्रासमवेत रिक्षा थांब्याजवळील बाकडावर बसले होते. त्यावेळी तेथे ऍक्‍टीवा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या आईला तीन हजार रूपये तातडीने पाठवायचे असल्याने भावनिक होऊन त्यांच्याकडे मदत मागितली. बोलत असताना त्यांनी वृद्ध दोंदे यांचा विश्‍वास संपादन केला. आणि मग...

दुसरी पुडी दोंदे यांच्या खिशात ठेवली
याप्रकरणी हिरामण बारकू दोंदे (71, रा. भारतरत्न रो हाऊस, विद्यानगर, मखमलाबाद रोड) यांच्या फिर्यादीनुसार, श्री. दोंदे हे सोमवारी (ता. 29) दुपारी आपल्या एका मित्रासमवेत विद्यानगरी येथील रिक्षा थांब्याजवळील बाकडावर बसले होते. त्यावेळी तेथे ऍक्‍टीवा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या आईला तीन हजार रूपये तातडीने पाठवायचे असल्याने भावनिक होऊन त्यांच्याकडे मदत मागितली. बोलत असताना त्यांनी वृद्ध दोंदे यांचा विश्‍वास संपादन केला. गोड बोलून श्री. दोंदे यांनी दिलेले तीन हजार रूपये, त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, अंगठी अशा ऐवज एका कागदात पुडीत बांधून खाली ठेवला आणि संशयितांनी हातचलाखी करीत दुसरी पुडी दोंदे यांच्या खिशात ठेवून त्यांनी पोबारा केला.

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

फसवणुकीचा गुन्हा दाखल

मखमलाबाद रोडवर भावनिक मदत मागताना संशयिताने हातचलाखीने वृद्धाचे 63 हजार रूपयांचे दागिणे लंपास केल्याची घटना घडली.याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cheating with old man nashik marathi news