
दिल्लीभोवती आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आलेले नसून, ते भारतीय नागरिकच आहेत. आता आंतरराष्ट्रीय कलावंतांकडून शेतकऱ्यांची बाजू घेतली जात असल्याने हे आंदोलन जागतिक स्तरावर पोचले आहे. आता एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सेलिब्रिटीजनी आपली नेमकी भूमिका जाहीर करावी.
नाशिक : दिल्लीभोवती आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आलेले नसून, ते भारतीय नागरिकच आहेत. आता आंतरराष्ट्रीय कलावंतांकडून शेतकऱ्यांची बाजू घेतली जात असल्याने हे आंदोलन जागतिक स्तरावर पोचले आहे. आता एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सेलिब्रिटीजनी आपली नेमकी भूमिका जाहीर करावी. ते शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहिले तर अन्य देशांतील कलावंतांना पुढाकार घेण्याची आवश्यकता भासणार नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. ५) व्यक्त केली.
उपमुख्यमंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील
काँग्रेस पक्ष कोणाला प्रदेशाध्यक्ष करतेतो किंवा कोणाला कुठले पद येते हा सर्वस्वी काँग्रेस पक्षाचा विषय आहे. दावा तर मुख्यमंत्रिपदासाठीदेखील करता येऊ शकतो; परंतु प्रत्यक्षात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत पक्षश्रेष्ठी ठरवतील तोच अंतिम निर्णय असेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच
पालकमंत्री भुजबळ : इंधनावर केंद्राचाच अधिक कर
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इंधन दरवाढ व त्याविरोधात सुरू असलेल्या भाजपच्या आंदोलनाबाबत प्रश्नावर भुजबळ म्हणाले, की लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे; परंतु राज्य शासनाच्या तुलनेत केंद्र सरकारकडून इंधनावर जादा प्रमाणात कर आकारला जातो. त्यात कपात करून केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा द्यावा.
हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल
जिल्हा बँकेने सामंजस्याने घ्यावे
थकीत कर्जप्रकरण नोटीस बजावल्यानंतर शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेविषयी ते म्हणाले, की जिल्हा बँकेने सामंजस्याने परिस्थिती हाताळायला हवी. यापूर्वीच कोरोनाकाळात शेतकऱ्याच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. त्यातच नोटिसा व अन्य बाबींतून दडपण आणायला नको. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.