"सर्व पात्र लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मिळण्याची काळजी रेशन दुकानदारांनी घ्या"

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 8 April 2020

शासनाने जाहीर केल्याप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये मोफत तांदुळ वाटपाचे काम सुरु झालेले आहे. उरलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच फ्री राईस वाटप सुरु होणार आहे. राज्यात कुठेही स्वस्त धान्य दुकानाबाबत तक्रार येणार नाही व सामान्य नागरिकांना चांगली सेवा मिळेल याबाबत दक्षता घ्यावी, काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही मंत्री भुजबळ यांनी  म्हटले आहे.

नाशिक : रेशनदुकानदारांचे काम आज सर्वात महत्वाचं आहे. आज राज्यातील रेशन दुकानदार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. जी सेवा ते देत आहेत ती निश्चितच प्रशंसनीय आहे, सर्व पात्र लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मिळेल, याची काटेकोर काळजी रेशन दुकानदारांनी घ्यावी. त्यांना सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ यांनी केले आहे.रेशन दुकानांमध्ये ब्लॅक मार्केटिंग होणार नाही, याचीही काळजी घ्यावी.

काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाई

नियमित नियतनातील धान्य नियमाप्रमाणे 2 रु किलो गहू व 3 रु. किलो तांदूळ या दरानेच विकले जाईल याची दक्षता घ्यावी. कारण सध्या सर्वसामान्य लोक अडचणीत आहेत या काळात आपण माणुसकीने वागून त्यांची प्रामाणिकपणे सेवा करणे अपेक्षित आहे असेही मंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे. एका स्वस्त धान्य दुकानदाराने याबाबत चूक केल्यास सर्व यंत्रणा बदनाम होते. अर्थात जे लोकं चुकीचे वागतात त्यांच्यावर नाईलाजाने कायदेशीर  कठोर कारवाई करणे भाग पडते. काल रावेर तालुक्यातील वाघोदा येथील स्वस्त धान्य दुकानदाराने जास्त पैसे घेतल्याबाबतचा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. याबाबत स्वस्त धान्य दुकान रद्द करण्यात आलेले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. अशी वेळ येवू न देता प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे.

VIDEO : नाशिकमध्ये कसा आढळला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह? 

उरलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच फ्री राईस वाटप

शासनाने जाहीर केल्याप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये मोफत तांदुळ वाटपाचे काम सुरु झालेले आहे. उरलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच फ्री राईस वाटप सुरु होणार आहे. राज्यात कुठेही स्वस्त धान्य दुकानाबाबत तक्रार येणार नाही व सामान्य नागरिकांना चांगली सेवा मिळेल याबाबत दक्षता घ्यावी, काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही मंत्री भुजबळ यांनी  म्हटले आहे.

हेही वाचा > होम क्वारंटाइन "आमदार' काही ऐकेना! केला "असा' कारनामा अन् पडले वादाच्या भोवऱ्यात!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chhagan bhujbal said be careful that the ration shopkeepers nashik marathi news