भुजबळ म्हणाले.."निकृष्ट प्रतीचा तांदूळ पुरवला...आता कारवाई अन् चौकशी तर होणारच"

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरित होणाऱ्या धान्याची भुजबळ नेहमी पाहणी करतात. आता प्राप्त तांदूळ व डाळीचे नमुने त्यांनी नाशिक जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून पाहणीसाठी मागवले होते. तांदळाचा दर्जा खराब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर भुजबळ यांनी नाशिकच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

नाशिक : कोरोना साथरोग काळात निकृष्ट प्रतीचा तांदूळ पुरवल्याप्रकरणी नागपूर आणि गडचिरोलीच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. तसेच निकृष्ट तांदूळ देणाऱ्या राइस मीलविरुद्ध जीवनावश्‍यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा. त्यांचा मिलिंग परवाना रद्द करावा, असा आदेश राज्याचे अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विभागाचे सचिव संजय खंदारे यांना दिले आहेत. 

भुजबळ : राइस मीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश 
अनेक जिल्ह्यांतून अशाच प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने राज्यस्तरीय उपनियंत्रक अंमलबजावणी आणि भारतीय अन्न महामंडळ प्रतिनिधींच्या नियंत्रणाखाली तपासणी पथके तयार करावीत. सीएमआर साठवलेल्या सर्व गुदामांची सखोल तपासणी करण्यात यावी, असाही आदेश भुजबळ यांनी श्री. खंदारे यांना दिला. सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरित होणाऱ्या धान्याची भुजबळ नेहमी पाहणी करतात. आता प्राप्त तांदूळ व डाळीचे नमुने त्यांनी नाशिक जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून पाहणीसाठी मागवले होते. तांदळाचा दर्जा खराब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर भुजबळ यांनी नाशिकच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नाशिक जिल्ह्यात नागपूर येथील गुदामातून तांदूळ प्राप्त झाला असून, नागपूर गुदामात आलेला तांदूळ गडचिरोली जिल्ह्यातील राइस मीलमधून प्रक्रिया होऊन प्राप्त झाल्याची त्यांना माहिती मिळाली. 

हेही वाचा > धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग

तपासणीससुद्धा जबाबदार धरा 
पात्र लाभार्थ्यांना निकृष्ट प्रतीचा तांदूळ पुरविल्याने सरकारची बदनामी होत आहे. तसेच गरजू लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत. ही अतिशय गंभीर बाब श्री. भुजबळांनी सचिवांच्या निर्दशनास आणून देत निकृष्ट प्रतीचा तांदूळ ताब्यात घेऊन गुदामात साठवणुकीसाठी जबाबदार असणारे तपासणीस जबाबदार धरण्यात यावे, असे सांगितले. 
हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा 'असा' दुर्देवी अंत...कुटुंबियांचा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chhagan bhujbal said District Supply of Nagpur, Gadchiroli Order to suspend officers