मुख्यमंत्री ठाकरेंच्या त्या ट्‌विटने.. कतारमध्ये अडकलेल्यांना परतीची आशा! 

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 18 June 2020

आखाती देशातील कतारमध्ये अडकून असलेल्या महाराष्ट्रातील 180 मराठी बांधवांच्या परतीच्या आशा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्‌विटने जागृत झाल्या आहेत. कोरोनामुळे कंपन्या बंद पडल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून ते कतारमध्ये अडकून असून, त्यांना भारतात परतायचे आहे.

नाशिक : आखाती देशातील कतारमध्ये अडकून असलेल्या महाराष्ट्रातील 180 मराठी बांधवांच्या परतीच्या आशा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्‌विटने जागृत झाल्या आहेत. कोरोनामुळे कंपन्या बंद पडल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून ते कतारमध्ये अडकून असून, त्यांना भारतात परतायचे आहे. त्यासंदर्भातील वृत्त बुधवारी (ता. 17) "सकाळ'मधून प्रसिद्ध झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत काय ट्विट केलयं ते वाचा...

मुख्यमंत्र्यांनी केले ट्विट
आखाती देशातील कतारमध्ये नाशिकचे शिवाजी पाटील यांच्यासह सुमारे 180 महाराष्ट्रातील नागरिक अडकले आहेत. परदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत भारतामध्ये आणण्यासाठी केंद्र सरकारने "वंदे भारत' अभियान सुरू केले आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी ट्‌विटरद्वारे बुधवारी (ता. 17) सकाळी ट्‌विट केले. येत्या 1 जुलैपर्यंत आणखी 76 विमाने मुंबईच्या विमानतळावर उतरणार आहेत. त्यामुळे अजूनही परदेशात अडकलेल्यांना भारतात परत आणले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या ट्‌विटला रिट्‌विट करीत कतारमध्ये अडकून असलेल्यांसाठी दोहा ते मुंबई विमानाची सोय करण्याची मागणी करीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारही मानले आहेत.  

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Thackeray's tweet gives hope to those trapped in Qatar to return nashik marathi news