esakal | नांदगाव हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे? गृहमंत्र्यांचे महानिरीक्षकांना निर्देश 
sakal

बोलून बातमी शोधा

nandgaon murder 123.jpg

गेल्या महिन्यात ७ ऑगस्टला रिक्षाचालक समाधान चव्हाण त्याची पत्नी भारताबाई व दोन लहान मुले अशी चौघांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्या कुणी व कशासाठी केली, याच्या शोधासाठी नांदगाव व मालेगाव तालुक्यातील पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनीही महिनाभर परिसरात तळ ठोकला होता.

नांदगाव हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे? गृहमंत्र्यांचे महानिरीक्षकांना निर्देश 

sakal_logo
By
संजीव निकम

नाशिक / नांदगाव : गेल्या महिन्यात ७ ऑगस्टला रिक्षाचालक समाधान चव्हाण त्याची पत्नी भारताबाई व दोन लहान मुले अशी चौघांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्या कुणी व कशासाठी केली, याच्या शोधासाठी नांदगाव व मालेगाव तालुक्यातील पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनीही महिनाभर परिसरात तळ ठोकला होता. तालुक्यातील वाखारी हत्याकांडाच्या घटनेला एक महिना उलटून झाला तरी पोलिसांच्या तपासातून कुठलाही निष्कर्ष हाती लागत नसल्याने या घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.

आमदार कांदे यांच्या मागणीनंतर गृहमंत्र्यांचे महानिरीक्षकांना निर्देश 

तालुक्यातील वाखारी हत्याकांडाच्या घटनेला एक महिना उलटून झाला तरी पोलिसांच्या तपासातून कुठलाही निष्कर्ष हाती लागत नसल्याने या घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. दरम्यान, आमदार कांदे यांच्या मागणीची दाखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीआयडीच्या महानिरीक्षकांना पुढील कार्यवाहीबाबत निर्देश दिले. त्यामुळे लवकरच तपासाची सूत्रे सीआयडीकडे अधिकृतरीत्या हस्तांतरित होतील. 

तपासाचे धागेदोरे हाती लागत नव्हते

विधिमंडळाचे दोनदिवसीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. आमदार कांदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत वाखारी (ता. नांदगाव) येथे गेल्या महिन्यात ७ ऑगस्टला रिक्षाचालक समाधान चव्हाण त्याची पत्नी भारताबाई व दोन लहान मुले अशी चौघांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्या कुणी व कशासाठी केली, याच्या शोधासाठी नांदगाव व मालेगाव तालुक्यातील पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनीही महिनाभर परिसरात तळ ठोकला होता. शिवाय पंचक्रोशीत विविध ग्रामस्थांची चौकशी करण्यात आली. मात्र त्यातूनही फारसे हाती काही लागत नसल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गेल्या आठवड्यात ठिय्या आंदोलनही केले. या घटनेचा तपास योग्य दिशेने व्हावा म्हणून पोलिसांनी माहिती देणाऱ्यास अगोदर २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, त्यात वाढ करून ५१ हजार रुपयापर्यंत बक्षिसाची रक्कम वाढविण्यात आली. मात्र आमदार कांदे यांनी त्यात पुन्हा ५० हजार रुपयांची भर टाकल्याने ती रक्कम एक लाख झाली. एवढे सर्व करूनही तपासाचे धागेदोरे हाती लागत नसल्याने मंगळवारी (ता. ८) आमदार कांदे यांनी गृहमंत्र्यांची भेट घेत हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी केली. 


रात्रीच्या वेळी आई-वडिलांच्या कुशीत झोपलेल्या निरागस व निष्पाप बालकांचाही नराधमांनी आई-वडिलांसमवेत बळी घेतला. आपण घटनेच्या दिवशीच सीआयडीकडे तपास द्यावा, अशी भूमिका घेतली होती. मात्र स्थानिक तपासाचे काम करणाऱ्या यंत्रणेच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून सहकार्य केले. एवढे करूनही तपासातून हाती काही लागत नसल्याचे गृहमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. -सुहास कांदे, आमदार, नांदगाव विधानसभा मतदारसंघ 


हेही वाचा > धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा

घटनाक्रम 
-७ ऑगस्टला हत्याकांड, श्वानपथकास पाचारण 
-फॉरेन्सिक वैद्यकीय पथकाकडूनदेखील घटनास्थळावरून रक्ताचे व अन्य नमुने पृथक्करणासाठी ताब्यात 
-पन्नासहून अधिक ग्रामस्थांची चौकशी, ग्रामस्थांकडून आंदोलन 
-घटनेपासून परिसरातील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली  

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

संपादन - ज्योती देवरे