धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह दोन दोन दिवस पडून; नागरिकांमध्ये संताप

सतीश निकुंभ
Friday, 28 August 2020

कोरोनाबाधीत मृत्यूच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पण कोरोनाबाधित मृतदेह दोन दोन तसेच दिवस पडून राहत असल्यामुळे संबंधित नातेवाईक संतप्त झाल्याचे पाहायला मिळते. ​

नाशिक / सातपूर : कोरोनाबाधीत मृत्यूच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पण कोरोनाबाधित मृतदेह दोन दोन तसेच दिवस पडून राहत असल्यामुळे संबंधित नातेवाईक संतप्त झाल्याचे पाहायला मिळते. यावर नागरिकांची काय मागणी आहे वाचा...

कोरोनाबाधित मृतदेह चक्क दोन दोन दिवस पडून
दरम्यान उत्तर महाराष्ट्राची राजधानी आसलेल्या नाशिकमध्ये केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नाशिक असे पाच जिल्ह्यातून विविध रूग्ण दाखल होत आहेत. त्यात कोरोनाबाधीत मृत्यूच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. हे सर्व मृतदेह नाशिकमध्ये पंचवटीतील डिझेल वाहीनीद्वारे व्हिलेवाट लावण्याचे काम करण्यात येत आहे. पण गेल्या दोन आठवड्यापासून कोरोना बाधित मृत्यूची संख्या अधिक पटीने वाढली आहे. यामुळे या यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. मृतदेह दोन दोन दिवस पडून राहत आसून यामुळे संबंधित नातेवाईक संतप्त झाल्याचे पाहायला मिळते. यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था वाढवण्याची मागणी या निमित्ताने होत आहे. सातपूर मधील तीन मृतदेह गेल्या दोन दिवसांपासून पडून आहेत. यासाठी नगरसेवक माधुरी बोलकर व त्याचे पती गणेश बोलकर प्रयत्न करत आहेत. पण प्रशासन मात्र हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

४८ तास होऊनही अंत्यविधीला नंबर लागत नाही

नाशिक सह जिल्यातील विविध भागातील कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहाची ४८ तास होऊनही अंत्यविधीला नंबर लागत नसल्याने संबंधित नातेवाईक संतप्त झाले आहे प्रशासनाने केवळ डिझेल वाहिनीवर अवलंबून न राहता इतर पर्याय सुरू करण्याची मागणी नातेवाईकांसह नगरसेवक करत आहे.

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्क

पहिले पंचवीस नंबर आहेत. त्या नंतर नंबर लागेल माजी मंत्री जय कुमार रावल याचे पिए यांचे नाशिकमध्ये उपचार घेत असतांना मृत्यू झाला तसेच सातपूर मधील तिन जणांचाही मृत्यू झाला आहे. गेले दोन दिवसांपासून हे सर्व मृतदेह पडून आहे. त्याचा अंत्यविधी कधी होणार असे विचारले तर पहिले पंचवीस नंबर आहेत. त्या नंतर लागेल असे उत्तर मिळते नातेवाईक यामुळे खोळंबून आहेत. या बाबत प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी अन्यथा आदोलन करावे लागेल - गणेश बोलकर, सामाजिक कार्यकर्ते सातपूर.

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizen angry due to corona affected dead bodies nashik marathi news