निर्भयाचं प्रकरण अजूनही सुरुच...आरोपी फासावर लटकणार कधी?

uddhav thakre 2.jpg
uddhav thakre 2.jpg

नाशिक : निर्भयाचं प्रकरण अजूनही सुरुच आहे. फासाचा दोर लटकतोय, आरोपी कधी फासावर चढणार? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. 16) येथे केला. नाशिकमध्ये अडीच एकर जागेवर जिल्हा न्यायालयाच्या प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. देशातील संथ न्यायप्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई देखील उपस्थित होते 

अजूनही ब्रिटिश कायदे सुरुच...
लासलगावमध्ये घडलेल्या घटनेचा खटला जलदगतीने करु असं विधान केलं, तर तो न्यायालायचा अपमान आहे. म्हणजे न्यायालय संथगतीने काम करतात असा त्याचा अर्थ होतो. मात्र, निर्भयाचं प्रकरण अजूनही सुरुच आहे. फासाचा दोर लटकतोय, आरोपी कधी फासावर चढणार? अजूनही ब्रिटिश कायदे सुरु आहेत. नवीन आव्हानांनुसार बदललं पाहिजे. असं मुख्यमंत्री म्हणाले.

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, ही लोकभावना आता खोटी ठरावी

न्यायपालिकेने व्यवस्थेच्या चुका दाखवाव्यात; पण माझ्या मते, न्यायालयाच्या इमारतींची गरजच असता कामा नये. त्यापेक्षा गुन्हे कमी व्हावेत. खटले त्वरित मार्गी लागावेत यासाठी प्रयत्न करायला हवेत. गुन्हे घडणारच नाहीत, असा समाज घडविण्याची गरज आहे. तसे न झाल्यास न्यायालयाच्या इमारती कमी पडतील. गुन्हेगारांची बाजू घेऊन खटले लढू नका, असे म्हणणार नाही; पण आपली बाजू घेणारे कोणी नाही, हे जेव्हा गुन्हेगारांना कळेल, तेव्हा गुन्हे कमी होतील. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, ही सामान्यांच्या मनातील लोकभावना आता खोटी ठरविता येईल. न्यायपालिकेने त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. 16) येथे केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com