विद्यार्थिनीने शौचालय उघडताच दिसला भयानक प्रकार...एकच खळबळ.. नर्सिंग महाविद्यालयातील प्रकार!

cobra hospital.jpg
cobra hospital.jpg

नाशिक / मालेगाव : महाविद्यालयात ८० ते ९० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाच्या शेजारी मुलींचे वसतिगृहदेखील आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे महाविद्यालयाचे कामकाज सुरू होते. पावणेबाराच्या सुमारास महाविद्यालयातील विद्यार्थिनी शौचालयाकडे गेली. त्यावेळी तिथे विद्यार्थीनीला असे काही दिसले ज्याने सगळ्य़ांचीच पाचावर धारण बसली..आणि एकच गोंधळ उडाला

जेव्हा नर्सिंग महाविद्यालयात अचानक होते त्याची एंट्री!
महाविद्यालयात ८० ते ९० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाच्या शेजारी मुलींचे वसतिगृहदेखील आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे महाविद्यालयाचे कामकाज सुरू होते. पावणेबाराच्या सुमारास महाविद्यालयातील विद्यार्थिनी शौचालयाकडे गेली. शौचालय उघडताच तिला शौचाच्या फ्लश टँकवर भला मोठा कोब्रा दिसला. कोब्रा पाहताच या विद्यार्थिनीची पाचावर धारण बसली. सुदैवाने तिने शौचखोलीत प्रवेश केलेला नव्हता. ओरडतच बाहेर आलेली विद्यार्थिनी काही वेळ गोंधळली. तिने सोबतच्या विद्यार्थिनींना हा प्रकार सांगितला. प्रभारी प्राचार्या संगीता कासार यांना ही माहिती मिळताच त्यांनी सर्पमित्र नितीन सोनवणे यांना दूरध्वनी केला. पकडलेला कोब्रा साडेचार फुटांचा आहे. 

सर्प मारू नये. तातडीने कळवावे,

महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून शंभर फुटांच्या आत शौचखोलीत हा कोब्रा आला कसा याची व सोनवणे यांनी कोब्रा ज्या शिताफीने पकडला त्याचीच चर्चा सुरू होती. दुपारी वन विभागाच्या मदतीने निसर्गाच्या सान्निध्यात कोब्रा सोडल्याचे सोनवणे यांनी सांगितले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साप बाहेर येतात. नागरिकांनी साप आढळल्यास घाबरून न जाता त्यावर लक्ष ठेवावे. सर्प मारू नये. तातडीने सर्पमित्रांना कळवावे, असे आवाहन सोनवणे यांनी केले. सर्पमित्र नितीन सोनवणे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९८२३५५७५२७ असा आहे.  

नागाला शिताफीने पकडताच सुटकेचा नि:श्‍वास

शहरातील सामान्य रुग्णालयाच्या आवारातील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात बुधवारी (ता. ५) दुपारी भारतीय नाग (इंडियन कोब्रा) हा विषारी सर्प आढळल्याने अन्‌ एकच धावपळ उडाली. वन विभागाचे सर्पमित्र नितीन सोनवणे यांनी महाविद्यालयात धाव घेत अवघ्या १५ ते २० मिनिटांत या नागाला शिताफीने पकडले अन्‌ विद्यार्थिनींसह प्राध्यापक व उपस्थितांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. 

रिपोर्ट - प्रमोद सावंत

संपादन - ज्योती देवरे


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com