
ज्वारीत असणाऱ्या अमिनो सीड्समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात. तसेच फायबर असल्याने सहज चपातीपेक्षा भाकरीचे पचन चांगले होते. बद्धकोष्ठता, पित्तविकार, मुतखडा अशा रुग्णांना भाकरीचा वैद्यकीय सल्ला दिला जात आहे. आता त्यात मधुमेही रुग्णांची भर पडली आहे.
नाशिक : अनेक वर्षांपासून निफाड तालुक्यात ज्वारीचा धान्य बाजार तेजीत दिसून येतो. गव्हापेक्षा ज्वारीचे भाव वाढले आहेत. परिणामी, हॉटेलमध्ये चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी महाग आहे. धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत आहाराबाबत नागरिकामंध्ये जागृती झाल्याचे दिसून येते. त्यातही मधुमेही व्यक्तींना आता गव्हाच्या चपातीऐवजी ज्वारीची भाकरी खायचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे एकूणच गव्हापेक्षा ज्वारी अधिक भाव खात आहे.
गव्हाची चपाती पचनात जड;
बैठ्या कामाच्या जीवनशैलीमुले पचनक्रियेचे विकार वाढले आहेत. अशा व्यक्तींसाठी चपाती पचवणे अवघडच. महाराष्ट्रीयन थाळीत चपाती हा महत्त्वाचा घटक मानला जातो. सिंचनाचे क्षेत्र वाढल्याने गव्हाच्या पेरणीचे क्षेत्र वाढले. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातून ज्वारीचे क्षेत्र अक्षरश: हद्दपार झाले. पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने आता ज्वारीचा भाव चांगलाच वधारला आहे. सर्वसामान्यांची कष्टाची भाकर महाग झाली आहे.
भाकरीमुळे वजनात घट
गतवर्षी दुष्काळ व अतिवृष्टीमुळे ज्वारीचे उत्पादन कमी झाल्याने आणि स्वस्त धान्य दुकानांतही गहू मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने ग्रामीण भागातही चुलीवर सर्रास चपाती दिसत आहे. ज्वारीच्या उत्पादनात गेल्या काही वर्षांत सातत्याने घटच होत आहे. ज्वारीमध्ये कार्बाहायड्रेटसचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीत असणाऱ्या अमिनो सीड्समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात. तसेच फायबर असल्याने सहज चपातीपेक्षा भाकरीचे पचन चांगले होते. बद्धकोष्ठता, पित्तविकार, मुतखडा अशा रुग्णांना भाकरीचा वैद्यकीय सल्ला दिला जात आहे. आता त्यात मधुमेही रुग्णांची भर पडली आहे.
हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..
भाकरीचा दर वधारला
ज्वारीच्या घटत्या उत्पादनामुळे काही वर्षांत गव्हापेक्षा ज्वारीचे दर चढेच राहिले आहेत. सध्या ज्वारी 40 ते 45 रुपये प्रतिकिलो, तर गहू 25 ते 35 रुपये दराने किरकोळ बाजारात उपलब्ध आहेत. हॉटेलमध्येही रोटी व चपातीपेक्षा ज्वारीच्या भाकरीला अधिक दर लावला जातो. भाकरी करताना चपातीपेक्षा अधिक कौशल्य लागते. त्यामुळे भाकरीचे दर वधारले आहेत, असे हॉटेलचालकांचे मत आहे.
हेही वाचा > शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!
हेही वाचा > पक्षातून फुटलेल्यांना पदे...अन् आम्हाला फक्त शिस्तीचे धडे काय?