"शेतक-यांनो.. कृषिबीलाविषयी शंकाचे निरसन आम्ही करू"

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 26 December 2020

देशातील नऊ कोटींपेक्षाही जास्त शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात एका क्लिकवर एकाचवेळी कृषी सन्मान योजनेची धनराशी जमा करण्यात आली आहे. अशा अनेक शेतकरी हिताच्या योजना व कार्यक्रम सध्या राबविले जात आहेत. त्यातून भविष्यात शेतकरी स्वयंपूर्ण होईल.

नाशिक : देशातील नऊ कोटींपेक्षाही जास्त शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात एका क्लिकवर एकाचवेळी कृषी सन्मान योजनेची धनराशी जमा करण्यात आली आहे. अशा अनेक शेतकरी हिताच्या योजना व कार्यक्रम सध्या राबविले जात आहेत. त्यातून भविष्यात शेतकरी स्वयंपूर्ण होईल. असे खासदार डॉ. भारती पवार म्हणाल्या. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त मोहाडी (ता. दिंडोरी) येथे कृषी संवाद कार्यक्रम झाला.त्यावेळी त्या बोलत होत्या.

विरोधक पसरवताएत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज

खासदार पवार म्हणाल्या, विरोधक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. कृषी कायद्या संदर्भात काही शंका व अडचणी असल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. शेतकरी वर्ग हा कृषी बिलाच्या विरोधात नसून उलटपक्षी त्यांचे ह्या सुधारित कृषी बिलाला समर्थनच असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केलेले कृषी बील हे शेत-यांच्या हिताचेच आहेत.असे प्रतिपादन खासदार डॅा भारती पवार यांनी केले.

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

शेतक-यांना गीता भेट

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त मोहाडी (ता. दिंडोरी) येथे कृषी संवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतक-याच्या बाधावर जाऊन शेतक-यांना गीता भेट देण्यात आली. नवीन कृषी कायद्या संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा झाली. कृषी संवाद कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांशी थेट संबोधन मोठ्या पडद्यावर प्रक्षेपित करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप
या प्रसंगी आमदार देवयानी फरांदे, आमदार डॅा राहुल आहेर, नाशिक जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर,  भाजपचे प्रदेश सचिव बापूसाहेब पाटील, डॉ. सारिका डेर्ले,  नरेंद्र जाधव भागवतबाबा बोरस्ते, सतीश मोरे, सचिन दराडे, प्रमोद देशमुख, शाम बोडके आदी उपस्थित होते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contact us for queries regarding agricultural law said bharati pawar nashik marathi news