खरंच! कोरोना अपडेटची सर्व माहिती आता एकाच क्लिकवर..कसे ते वाचा

corona Dashboard
corona Dashboard

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने  कोरोनाचे उपचार घेणारे नेमके किती रुग्ण आहेत, रुग्णालयांमध्ये किती खाटा उपलब्ध आहेत, याची अधिकृत माहिती एकाच ठिकाणी  नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र आता  महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णयामुळे यंत्रणेसह नागरिकांनाही सर्व माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहे

हेल्थ प्राइम नाशिक डॅशबोर्ड कार्यान्वित

नाशिक कोरोनासंदर्भातील अपडेट माहिती मिळविण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई व महापालिकेतर्फे हेल्थ प्राइम नाशिक डॅशबोर्ड कार्यान्वित करण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सोमवारी (ता. 29) त्याचे अनावरण झाले. मे. फॉक्‍सबेरी टेक्‍नॉलॉजी यांनी हा डॅशबोर्ड कार्यान्वित केला आहे. डॅशबोर्डमध्ये रुग्णांची माहिती देण्यासाठी क्रेडाईने विकसित केलेल्या हेल्थ प्राइम नाशिक ऍपद्वारे माहिती मिळणार आहे. ऑनलाइन अनावरणप्रसंगी महापौर सतीश कुलकर्णी, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आदी उपस्थित होते. 

डॅशबोर्डवर अशी मिळेल माहिती 
शहरात सद्यःस्थितीत किती कोरोना रुग्ण आहेत, किती रुग्ण बरे होऊन घरी गेले, किती रुग्णांवर उपचार सुरू आहेत, किती रुग्णांचा मृत्यू झाला, विभागनिहाय रुग्णांची संख्या, वय व वर्गीकरणानुसार रुग्ण, तारखेनिहाय रुग्णांचा आलेख, महापालिका व खासगी रुग्णालयांमधील खाटांची संख्या, कोविड केंद्र व महापालिकेच्या विविध विभागांमार्फत कार्यवाहीचा तपशील, अतिदक्षता विभागातील खाटा व उपलब्ध व्हेंटिलेटरची माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध होईल. 

नाशिककरांनो येथे मिळेल घरबसल्या माहिती 

http://hpn.nmc.gov.in/Home/DownloadFile या लिंकवर ऍप डाउनलोड केल्यानंतर शहरातील हॉस्पिटलमध्ये कोरोनासाठी राखीव बेडची माहिती ऍप डाउनलोड करता येईल. हा डॅशबोर्ड नाशिक महापालिकेचे संकेतस्थळ www.nmc.gov.in यावर उपलब्ध  असून, त्यासाठी http://covidnashik.nmc.gov.in:8002/covid-19.html लिंक देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com