
अंबड लिंक रोडवरील संजीवनगर येथील 73 वर्षीय वृद्धाला गेल्या मंगळवारी (ता. 19) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेह आणि हृदयाचा त्रास होता. तर दाखल करतेवेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यावेळी त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात येऊन ते प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. मात्र तासाभरातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.
नाशिक : नाशिक शहरातील अंबड लिंक रोडवरील संजीवनगर येथील 73 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. गेल्या मंगळवारी (ता.19) ते जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असता, तासाभरात त्यांचा मृत्यु झाला होता. मात्र त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट गुरुवारी (ता. 21) पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. दरम्यान, दुपारपर्यंत आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आणखी 12 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. यात नाशिक शहरातील तिघांसह मालेगावातील आठ आणि संगमनेर (जि. नगर) येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 867 झाला आहे.
संजीवनगरमधील वृद्धांचा मृत्युनंतर पॉझिटिव्ह रिपोर्ट
अंबड लिंक रोडवरील संजीवनगर येथील 73 वर्षीय वृद्धाला गेल्या मंगळवारी (ता. 19) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेह आणि हृदयाचा त्रास होता. तर दाखल करतेवेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यावेळी त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात येऊन ते प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. मात्र तासाभरातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. तर, गुरुवारी (ता. 21) त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील ते कोरोनामुळे मयत झालेले तिसरे रुग्ण आहेत. यापूर्वी वडाळ्यातील एक गरोदर महिला आणि पंचवटीतील पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर मालेगावातील 40 बळी असून आत्तापर्यंत जिल्ह्यातील 43 रुग्ण कोरोनाचे बळी आहेत.
हेही वाचा > संशोधकांना सुखद धक्का! काळाराम मंदिरासमोर खोदकामात 'हे' काय आढळले?
12 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण वाढले
दरम्यान, गुरुवारी (ता. 21) दुपारपर्यंत आलेल्या रिपोर्टनुसार 12 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यात नाशिक शहरातील वडाळागावातील 20 वर्षीय तरुणासह एक महिला आणि संजीवनगरचा एक (मयत), मालेगावातील 8 आणि संगमनेर तालुक्यातील मनोली (जि. नगर) येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 867 झाला आहे.
हेही वाचा > GOOD NEWS : येवला, दाभाडी, ओझरच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा! 'हा' तालुकाही कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर