मास्कला दाखवला ठेंगा! कोर्टाचा मिळाला चांगलाच दणका

no mask.jpg
no mask.jpg

नाशिक : सार्वजनिक ठिकाणी उघड्यांवर थुंकणारे, मास्कविना वावरणारे आणि सामाजिक अंतराकडे कानाडोळा करणाऱ्यांविरुध्द एरवी पोलिसांकडूनच दंड आकारुन संबंधित व्यक्तीला सोडले जाते; मात्र साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार नागरिकांना गांभीर्य लक्षात यावे, म्हणून अशा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना थेट न्यायालयाचा दणका मिळाला आहे. वाचा सविस्तर...

काही नागरिकांना कायदा सुव्यवस्थेचे जराही गांभीर्य नसते

कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालय व जिल्हा प्रशासनाकडून मास्क वापराची सक्ती करण्यात आली आहे. तरीदेखील काही महाभागांकडून मास्कच्या वापराला फाटा देत सामाजिक अंतर न राखता सार्वजनिक ठिकाणी वावरताना आढळून येतात. अशा नागरिकांना कायदा सुव्यवस्थेचे जराही गांभीर्य नसते. बिनधास्तपणे वावरत असतात. पण यंदा कोरोना पार्श्वभूमीवर अशा नागरिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांवर न्यायालयात सुनावणी करण्यात आली.

निष्काळजीपणा कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही

यानुसार ७३ दोषी नाशिककरांना ४७ हजार ३०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यावरुन नागरिकांनी बोध घेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना दाखविलेला निष्काळजीपणा हा कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश

साथरोग, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.सार्वजनिक ठिकाणी वावरताना सर्रासपणे उघड्यांवर थुंकणारे, मास्कविना वावरणारे आणि सामाजिक अंतराकडे कानाडोळा करणाऱ्यांविरुध्द शहर पोलिसांकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११५, ११७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

न्यायालयाने असा ठोठावला दंड

मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एम. राजपुत यांनी २५ व्यक्तींना प्रत्येकी ७००, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी टी. एन. कादरी यांनी ३४ लोकांना प्रत्येकी ७०० रूपयांचा दंड सुनावला. तसेच मनाई आदेशाचे उल्लंघन करणार्‍या १४ जणांना प्रत्येकी ४०० रूपयांचा दंड न्यायालयाकडून ठोठावण्यात आला आहे. एकूण ७३ नाशिककरांना ४७ हजार ३०० रुपये दंड भरावा लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com