सख्खी बहीण अन् मेहुण्यावरच "त्याचा' सारखा संशय..अखेर मेहुण्यानेच त्याला एकट्यात नेले अन्..

crime kills.jpg
crime kills.jpg

नाशिक /नाशिक रोड : उपनगरच्या फर्नांडिसवाडीतील मैदानावर सराईत गुन्हेगाराच्या खुनाची उकल झाली असून, त्याचा मेहुणा व त्याच्या मित्रानेच कौटुंबिक वादातून खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक झाली. आठवडाभर चौकशीदरम्यान संशयित मेहुणा पोलिसांना हवी असलेली माहिती देत होता. मात्र गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने कोणताही पुरावा नसताना खुनाची उकल केली. 

अशी झाली उकल 
मृत प्रशांत वाघ सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्या वादातून वा सराईतांच्या टोळीतील वादातून खून झाला असावा, यादिशेने पोलिसांनी तपास सुरू केला. शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मृत प्रशांत वाघ याचे कौटुंबिक वाद असल्याची बाब समोर आली. त्यानुसार त्यांनी तपास केला. मृत वाघ यास दारूचे व्यसन होते. तो घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीला मारहाण करायचा. या मारहाणीला वैतागून ती प्रशांतच्या बहिणीकडे गेली. तिने समजावून सांगितल्यानंतरही तो ऐकत नसल्याने त्याची पत्नी तिच्या माहेरी निघून गेली. पत्नी नसल्याने बैचेन झालेला प्रशांत बहीण, मेहुण्यावर संशय घेत त्यांना शिवीगाळ करीत त्यांच्या मुलांना मारून टाकण्याच्या धमक्‍या देत होता. 29 फेब्रुवारीला दिवसभर बहीण-मेहुणा आणि मनोज शार्दूल यांनी समजावून सांगितले. जेवण केल्यानंतर दोघे त्याला फर्नांडिसवाडीच्या मैदानावर घेऊन गेले. तेथे पुन्हा त्यास समजावून सांगत असताना, वाघ याने त्याच्याकडील चाकू काढला आणि दीपक पुजारी याच्यावर धावून गेला. त्यात बाचाबाची होऊन पुजारी व शार्दूल यांनी त्याच चाकूने त्याच्यावर वार करीत त्याचा खून केला. पोलिस तपासादरम्यान संशयित मेहुणा नेहमी पोलिसांच्या संपर्कात होता. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय गेलाच नाही

फर्नांडिसवाडीतील खुनाची उकल; मेहुण्यासह दोघांना अटक 
दीपक जराप्पा पुजारी, मनोज किसन शार्दूल अशी संशयितांची नावे आहेत. चोऱ्या-घरफोड्यांचे गुन्हे दाखल असलेल्या प्रशांत वाघ याचा 29 फेब्रुवारीच्या मध्यरात्री खून झाला होता. आठवडाभर उपनगर पोलिसांसह शहर गुन्हे शाखेचे मध्यवर्ती गुन्हे शाखा, युनिट एक आणि दोन हे तीनही पथके समांतर तपास करीत होते. दोन संशयितांनी खुनाची कबुली दिली असून, त्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. 10) चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही कामगिरी पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त समीर शेख, युनिट दोनचे पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक श्रीराम पवार, श्‍याम भोसले, युवराज पाटील, श्रीराम सपकाळ, रमेश घडवजे, देवकिसन गायकर, अन्सार सय्यद, संतोष ठाकूर, संजय ताजणे, विजय पगारे, गौरव गवळी, जयंत शिंदे यांच्या पथकाने बजावली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com