गोदाघाट गजबजला! मंदिरे सुरु होताच दर्शनासाठी भाविकांची गर्दी; नियम पाळून दर्शनाचा लाभ

योगेश मोरे
Tuesday, 17 November 2020

काही ठिकाणच्या मंदिरात येण्यापूर्वी भाविकांना फिजिकल डिस्टंन्सिंग पाळत हाताला सॅनिटायझर लावले जात होते. मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग प्रसार होऊ नये यासाठी शासनाने विविध मठ मंदिरे बंद केली होती.

म्हसरूळ (नाशिक) : कोरोना संसर्गमुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद करण्यात आलेली देवदेवतांची मंदिरे काही अटी शर्तीवर पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिल्याने भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला जात आहे. सोमवारी (ता.16) दिवसभर गंगाघाटावर विविध देवी देवतांच्या मंदिरात दर्शनाला गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

देवाचे विधिवत पूजन करून आरती

सोमवारी (ता. 16) मंदिरे दरवाजे उघडताच भाविकांनी श्री काळाराम मंदिर, सांडव्यावरची देवी, कपालेश्वर मंदिर, साईबाबा मंदिर, येथे जाऊन दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी मंदिर उघडताच मंदिर प्रशासनाने मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे काम केले. त्यानंतर देवाचे विधिवत पूजन करून आरती केली. सकाळी भाविकांना रांगेने मंदिरात दर्शनासाठी सोडले. काही ठिकाणच्या मंदिरात येण्यापूर्वी भाविकांना फिजिकल डिस्टंन्सिंग पाळत हाताला सॅनिटायझर लावले जात होते. मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग प्रसार होऊ नये यासाठी शासनाने विविध मठ मंदिरे बंद केली होती.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला

कोरोना संसर्ग काही प्रमाणात कमी झाल्याने राज्य शासनाने मंदिरे सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याने पूजा साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी दुकाने पूर्वी प्रमाणे थाटलेली आहे. तब्बल आठ महिन्यांनी मंदिरे सुरू झाल्याने भाविक रात्री उशिरापर्यंत देवदर्शनाचा लाभ घेत आहेत.

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds of devotees for darshan as soon as the temples start nashik marathi news