फडणवीस म्हणतात.. "सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलिसांचे काम चांगलेच...परंतु..."

विक्रांत मते
Monday, 3 August 2020

बिहार पोलिस तपासासाठी आले असले तरी त्यांना तपास करू देण्याचा सल्ला देताना बिहारच्या पोलिस अधिकायांना कोरोंटाईन का केलं असा सवाल उपस्थित केला. सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास मुंबई कि बिहार पोलिसांनी करावा हे सुप्रिम कोर्ट ठरवेल

नाशिक : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून वाद सुरु आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, मुंबई पोलिसांवर कुठलाचं आरोप नाही. पोलीस चांगले काम करतं आहे. परंतू राजकीय दबावामुळे पोलिसांच्या कामा मध्ये खंड पडू शकतो असे सांगताना त्यांनी राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा संशय व्यक्त केला.

मुंबई पोलिसांचे काम चांगले 

बिहार पोलिस तपासासाठी आले असले तरी त्यांना तपास करू देण्याचा सल्ला देताना बिहारच्या पोलिस अधिकायांना कोरोंटाईन का केलं असा सवाल उपस्थित केला. सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास मुंबई कि बिहार पोलिसांनी करावा हे सुप्रिम कोर्ट ठरवेल. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारवर निर्माण झालेला संशय दुर करून जनभावनेचा आदर करण्याची मागणी त्यांनी केली. अमृता फडणवीस यांनी केलेलं सुशांत वर केलेल्या ट्विटचा गैरअर्थ काढू नये असे सांगताना या प्नकरणात लोकांना उत्तर द्यावे, आम्हाला राजकारण करायचं नाही. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटला आम्ही उत्तर देव शकतो परंतू त्यात काही अर्थ नसल्याचे ते म्हणाले. 

रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - ज्योती देवरे

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadnavis said about mumbai police nashik marathi news