दिंडोरी नगरपंचायत निवडणूक आरक्षणामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ 

संदिप मोगल  
Friday, 27 November 2020

दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या उपस्थितीत होऊन नऊ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. आरक्षणामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी परिस्थिती आहे.

लखमापूर (नाशिक) : दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या उपस्थितीत होऊन नऊ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. आरक्षणामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी परिस्थिती असून, राजकीय नेत्यांकडून राजकीय आडाखे बांधण्यास सुरवात झाली आहे. साहिल मोरे या बालकाच्या हस्ते सोडत चिठ्ठी काढण्यात आली. 

प्रभागनिहाय आरक्षण असे 

प्रभाग १ (कादवानगर, वक्रतुंडनगर)- नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला), प्रभाग २ (शिवाजीनगर)- सर्वसाधारण, प्रभाग ३ (शिंपी गल्ली, बोरस्ते वस्ती)- अनुसूचित जमाती (महिला), प्रभाग ४ (खालची गल्ली, चर्मकारवाडा, आंबेडकरनगर, कोराटे रोड)- अनुसूचित जमाती, प्रभाग ५ (रंगानाना पथ, परीट गल्ली, पांडे गल्ली)- सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ (पेठ गल्ली, धनगरवाडा, राजेश्वर गल्ली)- नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ७ (पालखेड रोड, नवीन कळवण रोड)- नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला), प्रभाग ८ (जवाहरनगर, विठ्ठलनगर)- सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ९ (विजयनगर)- अनुसूचित जमाती (महिला), प्रभाग १० (सिद्धार्थनगर, गांधीनगर)- अनुसूचित जाती, प्रभाग ११ (लुंबिनीनगर, निर्मला विहार, नवीन नाशिक, कळवण रोड)- नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग १२ (भवानीनगर, नवीन जुना कळवण रोड, तकवा)- अनुसूचित जमाती, प्रभाग १३ (मोठा वाडा, रथ गल्ली, गट्टी, कर्पे गल्ली)- सर्वसाधारण स्त्री, प्रभाग १४ (भवानीनगर)- सर्वसाधारण, प्रभाग १५ (इंदिरानगर, भवानीनगर)- अनुसूचित जाती महिला, प्रभाग १६ (इंदिरानगर)- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग १७ (कोळीवाडा, पाडेकरनगर, उमराळे चौफुली)- सर्वसाधारण.

 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dindori Nagar Panchayat Election reservation nashik marathi News