अवैध धंद्यांविरोधात आता थेट तक्रारीची सोय; जिल्हाधिकारींची माहिती 

suraj-mandhre.jpeg
suraj-mandhre.jpeg

नाशिक : जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्यांविरोधात थेट तक्रारींसाठी जिल्हा समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

केवळ अवैध धंद्यांच्याच तक्रारी स्वीकारणार
नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या या समन्वय कक्षाचा क्रमांक ०९४०५८६९९४० असून, ईमेल आयडी nashikhb123@gmail.com हा आहे. दिलेल्या क्रमांकावर केवळ अवैध धंद्यांच्याच तक्रारी स्वीकारल्या जातील. नागरिकांना जिल्ह्यात काही अवैध घटनांच्या माहितीसाठी या क्रमांकावर तक्रार करता येईल. तक्रार करताना घटना कोठे, कधी, काय याचा तपशील द्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले. 


या कक्षाचे प्रमुख समन्वयक म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे असतील. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार, सहाय्यक पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक बिसन भुतकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक के. एम. वीरकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, अन्न व औषध निरीक्षक चंद्रकांत मोरे, अमित रासकर समन्वय कक्षाचे सदस्य असतील. 


या कक्षात नागरिकांकडून आलेल्या केवळ अवैध धंद्यांबाबतच्याच तक्रारी नोंदविल्या जातील. संबंधित विभागाच्या ईमेलवर, तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार तत्काळ कार्यवाहीसाठी पाठविली जाईल. संबंधित विभाग दिलेल्या काळात त्या तक्रारींवर कार्यवाही करून समन्वय कक्षाच्या ईमेलवर कार्यपूर्ती अहवाल पाठवतील. -सूरज मांढरे, जिल्हाधिकारी  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com