"मी देखील शेतकऱ्याचा मुलगा, शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार"- भगतसिंग कोश्यारी 

माणिक देसाई
Friday, 25 September 2020

"मीदेखील शेतकऱ्याचा मुलगा असून, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असून, याबाबत केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी दिले.

नाशिक / निफाड : "मीदेखील शेतकऱ्याचा मुलगा असून, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असून, याबाबत केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी दिले. कांदा निर्यातबंदी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शेतकरी संघर्ष संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (ता.२४) संस्थापक-अध्यक्ष हंसराज वडघुले यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन कांद्याच्या प्रश्नाची दाहकता सांगितली. संघटनेचे पदाधिकारी व राज्यापाल यांच्यात तब्बल ४५ मिनिटे चर्चा झाली. 

भगतसिंग कोश्‍यारी : शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांशी चर्चा 
प्रत्येक वेळी शासनातील मंत्री सोयीनुसार धोरण राबवतात. केंद्र सरकार एकीकडे जीवनाश्यक वस्तूंबाबत कायदा करते, मग दुसरीकडे कांदा निर्यातबंदीचा निर्णय का घेत आहे, असा सवाल शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी राज्यपाल कोश्‍यारी यांच्याकडे केला. लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कांदाप्रश्नी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्यातबंदी निर्णय मागे घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून द्यावे. कारण उत्पादन खर्चही मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार 

शेतकरी विधेयकात शिवार खरेदी करताना शेतकऱ्याला आर्थिक संरक्षणाची तसेच किमान आधारभूत किमतीची एमएचपीबाबत कायद्यात अंतर्भाव व्हावा. निर्यातबंदी रद्द झाली. शेतकरी विधेयकात शेतकऱ्यांना संरक्षण न मिळाल्यास महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे जनआंदोलन हाती घेतील, अशा भावना संघटनेने राज्यपालांकडे मांडली. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब बच्छाव, योगेश रायते, राम निकम, मनोज भारती, दीपक भदाणे, विनायक पवार, विद्या वेखंडे उपस्थित होते. 
हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion with Bhagat Singh Koshyari and Farmers Association nashik marathi news