डीजे अत्याचार प्रकरण : अत्याचार करताना वापरलेल्या पिस्तूल अन् बॅटऱ्या अखेर...

dj follw up.png
dj follw up.png

नाशिक  : दरी-मातोरी येथील शिवगंगा फार्महाउसवरील डीजेवादक अत्याचार प्रकरणात वापरण्यात आलेले पिस्तूल धुळ्यातून अटक करण्यात आलेल्या संशयिताच्या घरातून, तर शॉक देणारी बॅटरी फार्महाउसमधूनच जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, अटक केलेल्या 11 संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी (ता.22) न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. 

संदेश काजळेसह 11 संशयितांची नाशिक रोड कारागृहात रवानगी 

दरी-मातोरी येथील शिवगंगा फार्महाउसवर कुख्यात गुन्हेगार संदेश काजळे याच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 9 जानेवारीला पार्टी होती. या पार्टीत दोघा डीजेवादकांना अमानुषपणे मारहाण व अनैसर्गिक कृत्य करण्यात आले होते. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी मुख्य संशयित व सराईत गुंड संदेश काजळे, निखिल पवार, प्रीतेश काजळे, संदेश वाघ, अभिषेक शिरसाठ, रोहित डोळस, संदीप भवाळकर, भूषण सुर्वे, रवींद्र सूर्यवंशी, सिद्धू मथुरे व प्रकाश वाघ या 11 संशयितांना अटक केली. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयितांची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, धुळ्यातून अटक करण्यात आलेला संशयित भूषण सुर्वे याच्या घरातून तालुका पोलिसांनी घटनेत वापरलेले पिस्तूल जप्त केले, तर डीजेवादकांना ज्या बॅटरीने शॉक देण्यात आले, ती बॅटरीही शिवगंगा फार्महाउस परिसरातून जप्त करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com