डीजे अत्याचार प्रकरण : संदेश काजळेसह तिघांना पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

दरी-मातोरी येथील शिवगंगा फार्महाउसवरील अत्याचारप्रकरणी बुधवारी (ता. 15) नवापूर (जि. नंदूरबार) येथून अटक करण्यात आलेला मुख्य संशयित व सराईत गुन्हेगार संदेश काजळेसह तिघांना गुरुवारी (ता.16) न्यायालयाने 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. या गुन्ह्यात आतापर्यंत 11 संशयितांना अटक झाली असून, आठ संशयितांची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी (ता. 17) संपत आहे

नाशिक : दरी-मातोरी येथील शिवगंगा फार्महाउसवरील अत्याचारप्रकरणी बुधवारी (ता. 15) नवापूर (जि. नंदूरबार) येथून अटक करण्यात आलेला मुख्य संशयित व सराईत गुन्हेगार संदेश काजळेसह तिघांना गुरुवारी (ता.16) न्यायालयाने 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. या गुन्ह्यात आतापर्यंत 11 संशयितांना अटक झाली असून, आठ संशयितांची पोलिस कोठडीची मुदत आज (ता. 17) संपत आहे. त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, नाशिक तालुका पोलिस ठाण्यात कोठडीची सुविधा नसल्याने या संशयितांची रवानगी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी भीमाशंकर ढोले तपास करीत आहेत. 

तिघांना ताब्यात
 या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांना कुख्यात संदेश काजळे महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नवापूर येथे जात नवापूर-सुरत रस्त्यावर मंगळवारी संदेश काजळे (वय 29) त्याच्यासोबत असलेले भूषण राजेंद्र सुर्वे (30, रा. भाईजीनगर, धुळे) व रवींद्र दत्तात्रय सूर्यवंशी (30, रा. नाशिक) या तिघांना ताब्यात घेतले होते. 

फक्त डीजे वाजविण्यास नकार....असा घडला प्रकार

पंचवटीतील पेठ फाटा परिसरात राहणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा गुरुवारी (ता. 9) वाढदिवस होता. त्यानिमित्त पार्टीसाठी त्याने कर्णनगर येथील डीजेचालकास दरी-मातोरी येथील फार्महाउसवर डीजे वाजविण्याची सुपारी दिली. रात्री दहानंतर डीजेचालकाने डीजे वाजविण्यास नकार दिला असता दोघा युवकांना दमबाजी करीत डीजे सुरू ठेवला. तथाकथित भाईसह दहा ते बारा साथीदारांनी यथेच्छ दारू पिऊन धिंगाणा सुरू केला. बाराला पुन्हा डीजे बंद करण्याची परवानगी मागताच सराईताने पिस्तूल काढत हवेत गोळीबार करून धाक दाखवून डांबून ठेवत डीजे पहाटेपर्यंत सुरू ठेवला. पहाटेच्या सुमारास या भाईने या युवकांना तुम्ही डीजे चांगला वाजविला नाही. "तुम्ही भाईला नाराज केले' असे सांगत युवकांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना नग्न करून सराईतासह साथीदारांनी दांडके, कमरेचे पट्टे काढून जबर मारहाण केली होती. कडाक्‍याची थंडी असताना गार पाणी टाकत काहींनी त्यांना शॉक दिला. या युवकांनी सोडण्यासाठी याचना केली असता अत्याचारात वाढ करीत अंगावरील सर्व कपडे काढून त्यांना नग्न करून एकमेकांसोबत कुकर्म करण्यास भाग पाडले होते. अत्याचारामुळे युवकांचा चेहरा सुजला होता तसेच संपूर्ण अंगावर जखमा आणि मारहाण केल्याचे काळेनिळे वळ उठले होते.

हेही बघा > PHOTO : धक्कादायक! यात्रेत चिमुरडी अचानक गायब...शोध घेतल्यावर धक्काच!

तुझा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू... 

तसेच या युवकांना बळबरीने दारू पाजत असताना तुम्हावर केलेल्या अत्याचारांचा व्हिडिओ बनविला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल करू आणि तुम्ही पोलिसांकडे गेला तरी चालेल, माझे तुम्ही काहीच करू शकणार नाही, असे म्हटला. पोलिस प्रशासन आपल्या खिशात आहे, असे सांगत शिवीगाळ केली असल्याचे या पीडित युवकांनी सांगितले. सकाळी सराईत झोपले असताना युवकांनी पळ काढला. पायी चालत कसेबसे घर गाठले. या युवकांना मारहाण व अत्याचाराचे प्रमाण अधिक असल्याने युवकांनी स्वतःला मित्रांच्या खोलीत दडवून घेतले होते. हा प्रकार त्यांच्या मित्रांना समजताच त्यांनी या दोघा युवकांची विचारपूस करीत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकारची दखल घेत तालुका पोलिस काय कारवाई करतात, याकडे परिसरवासीयांचे लक्ष लागले होते. 

हेही वाचा > VIDEO : ह्रदयद्रावक! पतंगामागे धावत होता चिमुकला...ऐन मकरसंक्रांतीलाच आक्रोश..

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DJ operator torture case suspected arrested by nashik police Crime Marathi News