नव्या पिढीवर डॉ.आंबेडकरांच्या संकल्पनेतील भारत घडविण्याची मदार

अरुण मलाणी
Monday, 14 December 2020

चीनसारख्या देशांना लोकशाहीचे वावडे असणे स्वभाविकच आहे. या देशांना नीतीमत्ताही नको असते. सध्या चीन तिथल्या बौद्धांना जी अमानुष वागणूक देत आहे, हे लक्षात घेता तो चीन पंचशील पायदळी तुडवणारा सत्ताधीश आहे, हे उघडच झाले आहे,असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिफेन्स अँन्ड स्टेटजिक स्टडी विभागाचे प्रमुख डॉ.विजय खरे यांनी केले. डॉ.आंबेडकरांना अभिप्रेत असलेला भारत युवापिढीने घडवावा, त्यांच्यावरच खरी मदार आहे, असेही खरे म्हणाले.

नाशिक : चीनसारख्या देशांना लोकशाहीचे वावडे असणे स्वभाविकच आहे. या देशांना नीतीमत्ताही नको असते. सध्या चीन तिथल्या बौद्धांना जी अमानुष वागणूक देत आहे, हे लक्षात घेता तो चीन पंचशील पायदळी तुडवणारा सत्ताधीश आहे, हे उघडच झाले आहे,असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिफेन्स अँन्ड स्टेटजिक स्टडी विभागाचे प्रमुख डॉ.विजय खरे यांनी केले. डॉ.आंबेडकरांना अभिप्रेत असलेला भारत युवापिढीने घडवावा, त्यांच्यावरच खरी मदार आहे, असेही खरे म्हणाले.

डॉ.खरे यांची अपेक्षाः विविध उदाहरणातून मांडला दृष्टीकोन
सेंट्रल हिंदु मिलीटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे संस्थापक धर्मवीर डॉ.बा,शि.मुंजे यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त सुरु असलेल्या ऑनलाइन व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ.खरे यांनी गुंफले. `भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरर्स थॉट ऑन डिफेन्स अँन्ड प्रेझेन्टस् सिच्युएशन` हा त्यांचा विषय होता. सेंट्रल हिंदु मिलिटरी एज्युकेशन सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगावकर हे अध्यक्षस्थानी होते. नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे हे यावेळी उपस्थित होते.

नव्या पिढीवर डॉ.आंबेडकरांच्या संकल्पनेतील भारत घडविण्याची मदार
भोसला मिलीटरी कॉलेजचे विद्यार्थी असलेल्या डॉ.खरे यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर स्लाईडशोद्वारे त्यांनी डॉ.आंबेडकराचे सुरक्षाविषयक विचार मांडले. ते म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सुरक्षा या विषयातील विचारांचं या देशासाठी देणं प्रचंड मोठे आहे. 1990 च्या दशकानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील योगदानाविषयी अधिक चर्चा झाली. त्या अगोदर दलितांचे कैवारी एवढीच एक मर्यादित चर्चा त्यांच्याबाबतीत होती. महाराष्ट्र शासनाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 22 खंड प्रकाशित केले आहेत. सामाजिक चळवळीसाठी याचा एक मोठा हातभार लागलेला आहे. जवळपास सर्वच क्षेत्रात बाबासाहेबांनी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपले योगदान दिले आहे. भारतीय संविधानाच्या मूल्याला जर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत असेल तर तो राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा या अर्थाने आपण पाहतो.

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ
स्वातंत्र्यपूर्वी अन् नंतरचे योगदान मोठेच
ते म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षा ही सीमा किंवा संरक्षण बजेट एवढे यापुरते मर्यादित नाही. कोविद महामारी पार्श्वभूमीनंतर जिओ पॉलिटिक्स मध्ये मोठ्या प्रमाणात बदल होईल. आरोग्य सेवा आर्थिक सुरक्षा हे जागतिक स्तरावर सुरक्षेच्या संदर्भामध्ये अधिक महत्त्वाचे असतील. आतंकवाद आणि पर्यावरणाची हानी हेही सुरक्षेच्यादृष्टीने महत्वाचे मुद्दे आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर अभूतपूर्व योगदान राहिले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मातापित्यांच्या घरातून सैन्याची पार्श्वभूमी राहिलेली आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
हिंदी-चीनी भाई भाईचा मुद्दा
कुठलाही राजनैतिक करार करत असताना १९५४ साली हिंदी चीनी भाई भाई नेहरूंच्या धोरणाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राष्ट्रीय सुरक्षा दृष्टिकोनातून विचार केला,असे नमूद करून डॉ.खरे म्हणाले, लोकशाही मूल्यांवर आधारित असलेल्या देशाची मैत्री करावी असे सुचवत विरोध दर्शवला होता   कायदा मंत्री असताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपला राजीनामा दिला. त्यांच्या मांडणीमध्ये तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार केला होता त्यातील एक हिंदू कोड बिल आणि दुसरा मुद्दा जम्मू-काश्मीरचा होता आणि तिसरा इतर मागासवर्गीय आरक्षण होता. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे,

चीन-पाकिस्तानबाबत चेतावणी
  राज्यसभेचे सदस्य असतांनाच डॉ.आंबेडकरांनी चीनच्या धोरणाविषयी स्पष्ट केले होते. बाबासाहेब त्यावेळी म्हणाले होते की,चीन हा घातक असून तो आगीप्रमाणे पसरणारा आहे. या आगीवत तो सर्वांनाच भस्मसात करेल. अगदी लोकशाहीसुद्धा त्यातून सुटणार नाही, चीनपासून दूर राहा. आज नसला तरी भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे,' असा इशारा त्यावेळी त्यांनी २६ ऑगस्ट १९५४ ला दिला होता. त्याचा प्रत्यय आपल्याला आता येऊ लागला आहे असे खरे म्हणाले, 

महार बटालियन
सामाजिक दृष्ट्या आपण एक आहोत हे राष्ट्रीय विचारांसाठी अधिक आवश्यक आहे माणसामाणसातील बंधुभावाचे महत्व हे अधिक आहे जेणेकरून जाती जाती मधील अंतर कमी होईल आणि जाती निर्मूलन दिशेने पाऊल पडेल.आपल्या देशातील शेती उद्योग हा रोजगार निर्मितीचा भाग असायला हवा. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या समानता राष्ट्र निर्माणाच्या दृष्टीतून अधिक महत्वाचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr munje Lecture series doctor khare speech nashik marathi news