नशेबाजांना कुत्ता गोळी विकणारा अखेर अटकेत..पोलीसांना सापडल्या आणखी थक्क करणाऱ्या गोष्टी

प्रमोद सावंत
Monday, 27 July 2020

झोडगे शिवारातील कंधाणे गावाच्या कमानीजवळ अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांचे विशेष पोलिसपथक, तसेच अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक यांनी संशयावरून बंद असलेल्या हॉटेलसमोर मुजम्मील हुसेन इस्त्राईल अन्सारी याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ विनापरवाना गुंगी आणणाऱ्या कुत्ता गोळ्या मिळून आल्या.

नाशिक / मालेगाव : झोडगे शिवारातील कंधाणे गावाच्या कमानीजवळ अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांचे विशेष पोलिसपथक, तसेच अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक यांनी संशयावरून बंद असलेल्या हॉटेलसमोर मुजम्मील हुसेन इस्त्राईल अन्सारी (वय २९, रा. काजी प्लॉट, धुळे) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ विनापरवाना गुंगी आणणाऱ्या कुत्ता गोळ्या मिळून आल्या.

औषध व सौंदर्यप्रसाधने कायद्यान्वये गुन्हा दाखल

शहरातील नशेबाजांना विक्री व वितरणाच्या उद्देशाने हुसेन सुमारे २८ हजार ८०० रुपये किमतीच्या १२ हजार गोळ्या बाळगताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून २९ हजारांच्या गोळ्या, पाच हजार रुपयांचा मोबाईल, ३० हजारांची दुचाकी असा सुमारे ६३ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते, औषध निरीक्षक चंद्रकांत मोरे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. मुजम्मील हुसेनविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात औषध व सौंदर्यप्रसाधने कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

हेही वाचा > पुतणीला सतत टोमणे मारणे भोवले काकाला... केले  आत्महत्येस प्रवृत्त

झाडाची फांदी तोडल्याच्या वादातून बेदम मारहाण 
विराणे (ता. मालेगाव) येथे झाडाची फांदी तोडल्याच्या वादातून व मागील भांडणाची कुरापत काढून महादेव रावत (५०, रा. विराणे) यांना व त्यांच्या सहकाऱ्याला नानाजी सोनवणे याच्यासह सहा जणांनी शिवीगाळ करत काठी व दगडाने बेदम मारहाण केली. दगडाचा मार बसल्याने महादेव जखमी झाले. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. सामान्य रुग्णालयातून उपचार करून परतल्यानंतर रावत यांनी नानाजी सोनवणेसह सहा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वडनेर-खाकुर्डी पोलिस ठाण्यात दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा >  संतापजनक! मुलाला भेटायला गेलेल्या विवाहितेला सासरच्यांकडून बेदम मारहाण 

 

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drug dealer was finally arrested by the police at kandhane nashik marathi news