अशीही माणुसकी! शुभमच्या अंधारमय जीवनात त्यांच्यामुळे नवीन उमेद; नवसंजीवनी मिळाल्याचा अनुभव

प्रमोद दंडगव्हाळ
Wednesday, 23 September 2020

त्याच्या जीवनात खऱ्या अर्थाने नवसंजीवनी मिळाल्याचा अनुभव आल्याचे दिसून आले. महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटना व रोटरी क्लबतर्फे अनेक अपघातग्रस्तांना कृत्रिम हात, पाय व इतर अवयव बसवण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. त्यांच्या या कार्याचे खऱ्या अर्थाने अपघातग्रस्त कुटुंबीय आभार मानत आहे. 

नाशिक : (सिडको)अपघातात पाय गमावल्यानंतर जीवन अंधारमय झालेल्या युवकाला अचानक कृत्रिम पाय बसवल्यानंतर ‘त्याच्या’ जीवनात नवीन उमेद जागविण्याचे काम महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटनेने केल्याने तो युवक फिरण्यास आणि बुधवारी (ता. १६) खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सज्ज झाला. 

खऱ्या अर्थाने नवसंजीवनी मिळाल्याचा अनुभव

गेल्या वर्षी सिडकोत विजेच्या तारेचा धक्का लागून जखमी झालेल्या युवकाला अपघातात एक पाय गमवावा लागला. त्यामुळे त्याला बाहेर फिरणेही कठीण झाले होते. ऐन उमेदीच्या वयात नाईलाज म्हणून त्याला घरी बसून राहावे लागत होते. त्याला महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटनेचा आधार मिळाला आणि बुधवारी त्याला कृत्रिम पाय बसवण्यात आले. त्याच्या जीवनात खऱ्या अर्थाने नवसंजीवनी मिळाल्याचा अनुभव आल्याचे दिसून आले. महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटना व रोटरी क्लबतर्फे अनेक अपघातग्रस्तांना कृत्रिम हात, पाय व इतर अवयव बसवण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. त्यांच्या या कार्याचे खऱ्या अर्थाने अपघातग्रस्त कुटुंबीय आभार मानत आहे. 

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

विजेचा धक्का लागून आमच्या घरातील आजी, आई व बहीण या तिघांचाही मृत्यू झाला. मलाही एक पाय गमवावा लागला. त्यामुळे माझे जीवन रुक्ष झाले होते. वीज वितरण कंपनीनेही मदत करण्यास नकार दिला होता. आज कृत्रिम पाय बसविल्यानंतर जेव्हा मी दोन पावले चाललो, तेव्हा कुठे मला आज जगण्याचा मार्ग मिळाल्यासारखे वाटले. - शुभम केदार (अपघातग्रस्त युवक)  

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the accidental trade union,young man in the accident remained standing nashik marathi news