#COVID19 : द्राक्षपंढरीतील द्राक्षबागा अडचणीच्या उंबरठ्यावर! मजुर नाही अन् व्यापारीही नाही

माणिक देसाई : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

द्राक्षबागेतील द्राक्षमाल काढला गेला नाही तर  पुढील हंगामासाठी उत्पादन घेता येणार नाही हा धोका लक्षात घेता बहुसंख्य द्राक्ष उत्पादक द्राक्षमालाचा बेदाणा तयार करुन घेण्याचा विचार करत आहे मात्र त्यासाठी लागणारा कामगार मिळेना‌ तसेच पुरक औषधे नेट गंधक याची उपलब्धि करण्यात लाॅक डाऊनने मोठा अडथळा आला आहे तर निर्यातक्षम द्राक्षमाल कोल्ड स्टोरेज साठविण्याची तयारी आहे मात्र त्यासाठी आवश्यक जागा शितगृहात मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक हैराण आहेत

नाशिक / निफाड : सध्या महाराष्ट्रातील द्राक्षपंढरीचा हंगाम भरात असतांना कोरोनाचे संकट उभे राहीले. काढणीला मजुर नाही अन् घ्यायला व्यापारी नाही अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून राज्यातील ८० हजार एकरवरील द्राक्षबागा अडचणीच्या उंबरठ्यावर आहे यातुन सरकारने मार्ग काढावा अशी मागणी द्राक्षउत्पादकांकडून होऊ लागली आहे.

मजुर नाही अन् व्यापारीही नाही

द्राक्षबागांच्या गोड्याबार छाटणीनंतर द्राक्षमालावर अवकाळी पाऊसाच्या थैमानाने रोग वाढले तर पुढील काळात थंडीमुळे द्राक्षमालाच्या प्रतवारिवर परिणाम झाला. द्राक्ष हंगाम सुमारे एक‌ महिना उशीरा सुरु झाला अन आता द्राक्ष हंगाम मध्यावर आला असतांनाच कोरोनाचे गंभीर संकट उभे राहिले आहे त्यामुळे लादलेली संचारबंदी नियम या कचाट्यात तयार द्राक्षमालास देशांतर्गत बाजारपेठेत मागणी बंद झाली आहे. द्राक्ष व्यापारी वर्गाने खरेदी बंद केली आहे तर द्राक्षमाल वाहतुक‌ करणारे ट्रान्सपोर्ट प्रत्यक्ष बाजारपेठेत द्राक्षमाल पोहचण्यास वाहतुकीच्या येणाऱ्या अडचणीमुळे हतबल झाले आहेत. 

आर्थिक डोलारा ढसाळणार

कोरोनामुळे राज्य व केंद्र सराकारने लादलेल्या नियमांमुळे जिल्हा बंदीमुळे द्राक्षमाल काढणी, त्याची पॅकिंग करणे,तसेच शितगृहात द्राक्षमालाची विरळणी करुन तो सिलबंद करणे याकरिता मजुर येण्यास तयार नाहीत तर दुसरीकडे द्राक्षमाल परिपक्व होऊन त्याचा निर्धारीत चार पाच महिन्याचा कालावधी होऊनही काढला गेला नाही तर द्राक्षमणी सुकवा पकडतील त्यातुन मोठे आर्थिक नुकसान द्राक्ष उत्पादकांचे होणार आहे 

@ द्राक्षमालावर प्रक्रिया

द्राक्षबागेतील द्राक्षमाल काढला गेला नाही तर  पुढील हंगामासाठी उत्पादन घेता येणार नाही हा धोका लक्षात घेता बहुसंख्य द्राक्ष उत्पादक द्राक्षमालाचा बेदाणा तयार करुन घेण्याचा विचार करत आहे मात्र त्यासाठी लागणारा कामगार मिळेना‌ तसेच पुरक औषधे नेट गंधक याची उपलब्धि करण्यात लाॅक डाऊनने मोठा अडथळा आला आहे तर निर्यातक्षम द्राक्षमाल कोल्ड स्टोरेज साठविण्याची तयारी आहे मात्र त्यासाठी आवश्यक जागा शितगृहात मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक हैराण आहेत.

हेही वाचा >PHOTOS : "बापरे! जर्मन नागरिकांचे नाशिकमध्ये काय काम?" नागरिकांमध्ये अचानक खळबळ

 शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधी आणि सरकारने वाचवावे

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाशी दोन हात करत आहे कोरोनाचे संकट भयंकर आहे, मान्य आहे परंतु त्यात शेतकरी भरडला जात आहे. अशातच अडचणीत असलेल्या  शेतकऱ्यांना लोकप्रतिनीधी आणि सरकारने वाचवावे - रामहरी पडोळ द्राक्ष उत्पादक शेतकरी

हेही वाचा > COVID-19 : 'शहराने पैसे कमवायला शिकवलं अन् गावाने निरोगी आरोग्य सांभाळायला!'...नोकरदार गावाकडे परतले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Corona the grapes farmers are in trouble Nashik Marathi News