लॉकडाउनमुळे राजश्री चंद्रात्रे बनल्या मालेगाव तालुक्यातील प्रथम महिला 'पुरोहित'!

राजेंद्र दिघे
Monday, 24 August 2020

याज्ञिकीचे शिक्षण त्यांनी ऑनलाइन घेतले. सोशल मीडियावर राजश्री यांनी पुणे येथील महिला पुरोहित संघाचा कार्यक्रम बघितला. या संघाची प्रेरणा घेऊन त्यांनी याज्ञिकी शिकण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रवीण उपासनी व राकेश जोशी यांना याज्ञिकी शिकविण्याची विनंती केली. 

नाशिक : (मालेगाव कॅम्प) कोरोनाने अनेकांचे रोजगार हिरावले. काहींना आपत्ती तर काहींनी याकडे इष्टापत्ती म्हणून पाहिले. कोरोनाचा फटका वृत्तपत्र व्यवसायातील घटकांना बसला. वृत्तपत्रे वितरण करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक कुटुंबांचा रोजगार गेला. मात्र या लॉकडाउनमध्ये पौरोहित्याचे काम शिकून मालेगाव तालुक्यातील प्रथम महिला पुरोहित होण्याचा बहुमानही मिळवला आहे.  

याज्ञिकी शिकण्याचा निर्णय

लॉकडाउनमध्ये वृत्तपत्र वितरक गिरीश चंद्रात्रे व राजश्री चंद्रात्रे यांना घरकामाव्यतिरिक्त दुसरे कुठलेही काम उरले नाही. अशा परिस्थितीत मार्ग काढत याज्ञिकी व पौरोहित्य शिक्षण घेण्याचा निर्णय राजश्री चंद्रात्रे यांनी घेतला. याज्ञिकीचे शिक्षण त्यांनी ऑनलाइन घेतले. सोशल मीडियावर राजश्री यांनी पुणे येथील महिला पुरोहित संघाचा कार्यक्रम बघितला. या संघाची प्रेरणा घेऊन त्यांनी याज्ञिकी शिकण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रवीण उपासनी व राकेश जोशी यांना याज्ञिकी शिकविण्याची विनंती केली. 

वास्तुशांतीसह दशक्रिया विधीच्या स्तोत्र-मंत्रांचे पठण करण्याचा मानस

लॉकडाउनमध्ये जाणार कस? हाही मोठा प्रश्न होता. या दोन्ही पुरोहितांनी त्यांना ऑनलाइन पाठ शिकविले. राजश्री यांचे बंधू अविनाश भंडारी यांनी त्यांना संबंधित पुस्तके आणून दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे लॉकडाउनच्या तीन महिन्यांच्या काळात राजश्री चंद्रात्रे याज्ञिकी शिकल्या. त्यानंतर राजश्री यांनी हरितालिका व गणेश प्रतिष्ठापना पूजा सांगून कामास सुरवात केली. या लॉकडाउनमध्ये पौरोहित्याचे काम शिकून मालेगाव तालुक्यातील प्रथम महिला पुरोहित होण्याचा बहुमानही मिळवला आहे. आगामी काळात वास्तुशांतीसह दशक्रिया विधीच्या स्तोत्र-मंत्रांचे पठण करण्याचा त्यांचा मानस आहे. 

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?

कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांना अनेक कटू प्रसंगाला सामोरे जावे लागले. अशाही स्थितीत वृत्तपत्र विक्रीचा अनुभव पाठीशी असल्याने नवं काही तरी शिकावे त्यानुसार पौरोहित्य ऑनलाइन शिक्षण घेत याज्ञिकी सुरू केले. - राजश्री चंद्रात्रे 

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the lockdown, Rajshri Chandratre became the first woman priest nashik marathi news