लॉकडाऊनमध्ये शिथिलता अन् नाशिककर फिरताय बिनघोर...वाहतूक शाखेचे मात्र दुर्लक्ष!

traffic.jpg
traffic.jpg

नाशिक : चौथ्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने रस्त्यावरती वाहनांची वर्दळ लक्षणीयरित्या वाढली आहे. कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये वाहतूक सिग्नलची यंत्रणाही बंद होती. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावरील चौकांतील वाहतूक सिग्नल यंत्रणा बंद असल्याने भरधाव वेगात धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्‍यता आहे. मात्र याकडे शहर वाहतूक पोलिस शाखेने सोयीस्कररित्या दूर्लक्ष केलेले आहे. 

मुख्य रस्त्यावरची वर्दळ वाढली

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. या काळात शहरातील रस्ते निर्मनुष्य होते. विनापरवानगी वाहने आढळून आल्यास गुन्हा दाखल करून वाहने जप्त केले जात होते. शहर पोलिसांनी सुमारे अडीच हजार दुचाक्‍या-चारचाकी वाहनांसह रिक्षा जप्त केलेल्या आहेत. रस्त्यावर वाहनेच नसल्याने शहरातील सारी सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आलेली आहे. मात्र चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये काहीप्रमाणात शिथिलता देण्यात आलेली आहे. कंपन्या, आस्थापना सुरू झाल्याने याठिकाणी काम करणारे घराबाहेर पडू लागले आहेत. अत्यावश्‍यक सेवेसह अन्य व्यावसायिकांना व्यवसायासाठी परवानगी दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे. 

सिग्नल बंद असल्याने दूर्घटनेची शक्‍यता

बाजारपेठांमधील रस्त्यावर वाहने वाढून वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवते आहे. तर मुख्य रस्त्यावर दुचाक्‍या, चारचाक्‍यांसह अवजड वाहनांचीही वर्दळ तर वाढलीच आहे. शिवाय वाहनांचा वेगही वाढलेला आहे. तर दुसरीकडे सिग्नल यंत्रणा बंदच आहे. त्यामुळे चौकांमध्ये भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांमुळे मोठी दूर्घटना घडून अपघात होण्याची शक्‍यता आहे. रस्त्यांवरचे बॅरिकेटिंग काढून घेण्यात आले आहेत. नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिस नसतात. त्यामुळे वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवून नेतात. त्यात सिग्नल बंद असल्याने दूर्घटना घडण्याची दाट शक्‍यता असून, त्याकडे वाहतूक पोलिस शाखेकडे सोयीस्कररित्या दूर्लक्ष केले गेले आहे. तरी सिग्नल यंत्रणा सकाळी 9 ते 5 यावेळेत सुरू करण्याची मागणी होते आहे. 

स्मार्ट रोड बनला पार्किंग-स्पॉट 

कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला स्मार्ट रोड चारचाकी वाहनांसाठी पार्किंग स्पॉट बनला आहे. अशोकस्तंभ ते सीबीएस चौकाच्या दुतर्फा चारचाकी वाहने पार्क केली जातात. वाहतूक शाखेकडूनही नो-पार्किंगची कारवाई सध्या बंदच असल्याचे शहरात येणाऱ्या चारचाकी वाहनचालकांसाठी स्मार्टरोडचा स्पॉट पार्किंगसाठी उत्तम पर्याय निर्माण झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com