esakal | साहेब..आम्हाला घरी आणा! नाशिकच्या प्रशिक्षणार्थींकडून मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना भावनिक साद 
sakal

बोलून बातमी शोधा

trainee student

रेल्वेच्या ऍप्रेंडेन्सशिपकरीता तमिळनाडूच्या मेहुपालियम शहरात 165, इरोड शहरात 167, तर कर्नाटक राज्यातील मंगळुरू शहरात 50 असे राज्यातील 382 प्रशिक्षणार्थी अडकून पडले आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यावर त्यांची ऍप्रेंडेन्सशिप संपली. मात्र देशात संचारबंदी असल्याने या सर्वांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे आणि वाहतुकीची कुठलीच व्यवस्था नसल्याने या प्रशिक्षणार्थींच्या पालकांची चिंता अधिकच वाढली आहे.

साहेब..आम्हाला घरी आणा! नाशिकच्या प्रशिक्षणार्थींकडून मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना भावनिक साद 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी ऍप्रेंडेन्सशिपसाठी तमिळनाडू, कर्नाटक राज्यात गेलेले महाराष्ट्रातील तब्बल 382 प्रशिक्षणार्थी लॉकडाउनमुळे तिथेच अडकले असून या सर्वांची मोठी गैरसोय होत आहे. हे सर्व प्रशिक्षणार्थी घरी येण्यासाठी तेथील प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र त्यांना त्यांच्याकडून केवळ आश्‍वासने मिळत असल्याने विद्यार्थी घाबरले आहेत. अखेर घरी परतण्याकरिता नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील मुलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ यांना "आम्हाला घरी यायचे आहे', अशी भावनिक साद घातली आहे. 

नाशिकच्या प्रशिक्षणार्थींकडून भावनिक साद 

रेल्वेच्या ऍप्रेंडेन्सशिपकरीता तमिळनाडूच्या मेहुपालियम शहरात 165, इरोड शहरात 167, तर कर्नाटक राज्यातील मंगळुरू शहरात 50 असे राज्यातील 382 प्रशिक्षणार्थी अडकून पडले आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यावर त्यांची ऍप्रेंडेन्सशिप संपली. मात्र देशात संचारबंदी असल्याने या सर्वांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे आणि वाहतुकीची कुठलीच व्यवस्था नसल्याने या प्रशिक्षणार्थींच्या पालकांची चिंता अधिकच वाढली आहे. घरी परत येण्याकरीता या सर्वांनी मोबाईलवर आलेले ऑनलाइन फॉर्म भरले आहेत. मात्र अद्याप कुठलीच कारवाई त्यावर झालेली नाही. या वेळी येथे इतर राज्यांतून आलेल्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या राज्य शासनाने गाड्यांमधून त्यांच्या राज्यात नेले आहे. आम्ही महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थी एकाकी पडलो असल्याचे या वेळी तिथे अडकलेल्या सर्वांनी सांगत घरी परतण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना भावनिक साद घातली आहे. येथील प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरू असून, केवळ आश्‍वासनेच मिळत असल्याचे एकाने सांगितले. 

लॉकडाउन जाहीर झाल्यापासून म्हणजे दोन महिने होत आले, मी तमिळनाडूमध्ये अडकलो आहे. प्रशासनाने तत्काळ विचार करून आमची सोडवणूक करावी. आमचे कुटुंब काळजीत आहे. आमची सहनशक्ती संपत आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळसाहेब यांना विनंती आहे, की आम्हाला घरी यायचे आहे - पवन निरभवणे (प्रशिक्षणार्थी, मनमाड) 

हेही वाचा > पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर सरपंचावर कोरोनाची मेहेरबानी...की आणखी काही? संशय कायम

प्रशिक्षणार्थी संख्या 
मेहुपालियम शहर (तमिळनाडू) 

नाशिक (33), जळगाव (81), बुलढाणा (7), नागपूर (1), कोल्हापूर (1), सोलापूर (1), अमरावती (6), अकोला (10), बीड (3), चंद्रपूर (8), नांदेड (6), गोंदिया (1), वर्धा (1), वाशीम (1), भंडारा (5) 

हेही वाचा > दिलासादायक! नाशिक शहरात कोरोनाला लागतोय "ब्रेक'...ही आहेत कारणे.. 
 
इरोड शहर (तमिळनाडू) 
नाशिक (21) जळगाव (93), बुलढाणा (7), नागपूर (2), कोल्हापूर (1), सोलापूर (1), अमरावती (6), अकोला (10), बीड (2), चंद्रपूर (8), नांदेड (6), गोंदिया (1), वर्धा (1), वाशीम (1), भंडारा (7) 
 
मंगळुरू (कर्नाटक) 
नाशिक (15), जळगाव (35) 

go to top