...तर जिल्ह्यात ऑगस्टअखेर कोरोनाचे ४० हजारांवर रुग्ण; मुंबई, पुणे, ठाण्यापाठोपाठ नाशिकमध्ये सर्वाधिक रुग्ण 

At the end of August there will be over 40 thousand corona patients in the nashik district
At the end of August there will be over 40 thousand corona patients in the nashik district

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला असून, यांपैकी निम्मे म्‍हणजे तब्‍बल दहा हजार रुग्‍णांची गेल्‍या २० दिवसांत भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्‍णसंख्या दुप्पट होण्याचा दर (डबलिंग रेट) सरासरी १६ ते १८ दिवसांचा राहिला आहे. यापुढेही याच दरानुसार रुग्‍णसंख्या वाढत राहिल्‍यास ऑगस्‍टअखेरीपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा ४० हजारांपर्यंत पोचण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

नाशिक जिल्ह्यात २९ मार्चला लासलगाव येथे, तर शहरातील गोविंदनगरमध्ये ६ एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्‍ण आढळला होता. त्‍यानंतर शहरासह जिल्‍हाभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. पहिल्‍या काही दिवसांमध्ये मालेगाव परिसरातील रुग्‍णसंख्येत लक्षणीय वाढ नोंदविली गेली; परंतु नंतरच्‍या कालावधीत नाशिकसह सिन्नर, येवला, मनमाड आदी तालुक्यांतही कोरोना रुग्‍ण आढळण्याचे प्रमाण वाढले होते. 
 
असे वाढत गेले रुग्‍ण 
रुग्‍णसंख्या एक हजार होण्यासाठी ३९ दिवस लागले, तर दोन हजार होण्यासाठी त्यापुढे २१ दिवस लागले. त्यानंतर १९ दिवसांत रुग्णसंख्या दोन हजारांहून चार हजार झाली, तर पाच हजारांहून रुग्‍णसंख्या दहा हजार होण्यासाठी १७ दिवस लागले होते. आता दहा हजारांहून रुग्‍णसंख्या २० हजार होण्यास २० दिवस लागले आहेत. 

पंधरा हजार रुग्‍णांची कोरोनावर मात 
आतापर्यंत आढळलेल्‍या २० हजार ५११ रुग्‍णांपैकी १५ हजार २८१ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. यात, नाशिक शहरातील दहा हजार ३५२ रुग्‍ण असून, नाशिक ग्रामीणचे तीन हजार ५५२, मालेगाव महापालिका हद्दीतील एक हजार २२५, जिल्‍हाबाह्य १५२ रुग्‍णांचा समावेश आहे. 


पॉझिटिव्‍ह रुग्‍णांचा दर २४.८९ टक्‍के 
आतापर्यंत जिल्ह्यात ८२ हजार ३९७ संशयित रुग्‍णांचे स्‍वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत. यांपैकी २० हजार ५११ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आलेला आहे, तर ६० हजार ८९८ रुग्‍णांचा अहवाल निगेटिव्ह आल्‍याने पॉझिटिव्‍ह रुग्‍णांचा दर २४.८९ टक्‍के राहिला. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत ९८८ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. 

रुग्‍णसंख्यावाढीचे टप्पे 
* एक हजार रुग्‍णसंख्या : २६ मे 
* दोन हजार रुग्‍णसंख्या : १५ जून 
* चार हजार रुग्‍णसंख्या : ३० जून 
* पाच हजार रुग्‍णसंख्या : ४ जुलै 
* दहा हजार रुग्‍णसंख्या : २१ जुलै 
* २० हजार रूग्‍णसंख्या : १० ऑगस्‍ट 


मुंबई, पुणे, ठाण्यापाठोपाठ नाशिकमध्ये सर्वाधिक रुग्ण 

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्र---------एक लाख २३ हजार ३८२ 
पुणे जिल्‍हा--------------------एक लाख १३ हजार चार 
ठाणे जिल्‍हा--------------------एक लाख चार हजार ९३५ 
नाशिक जिल्‍हा-----------------२० हजार ५११ 
रायगड-----------------------२० हजार १४३ 
औरंगाबाद--------------------१६ हजार २९८ 
जळगाव---------------------१४ हजार ४३८ 
सोलापूर---------------------११ हजार ७१२ 
कोल्‍हापूर--------------------आठ हजार ८८५ 
नागपूर----------------------आठ हजार ५८५ 
सातारा---------------------पाच हजार ६७९ 
(स्रोत ः सार्वजनिक आरोग्‍य विभाग)

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com