आरोग्यदायी जीवनासाठी व्यसनमुक्त होऊन आनंदा लुटा - पो.आ.दीपक पांडे 

pande cp 1.jpg
pande cp 1.jpg

नाशिक : आयुष्यातील खरा आनंद हा आरोग्यदायी जगण्यात आहे. आरोग्यदायी जीवनासाठी व्यसनमुक्त होऊन खऱ्या‍ जीवनाचा आनंदा लुटावा, असे आवाहन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी केले. 

सध्या एकही पोलिस कोरोनाग्रस्त नाही. - पोलिस आयुक्त 
पांडे म्हणाले, की व्यसनांमुळे अनेकदा चुका घडतात. कुठलेही व्यसन थोडे जरी केले तरी ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. महिलांना खूप वाटत असते, की पतींनी दारू सेवन करू नये, तंबाखू, सिगरेट सोडावी. पोलिस अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांना व्यसन सोडण्याची इच्छा असल्यास त्यांना सर्वतोपरी मदत आयुक्तालयांकडून दिली जाईल. पोलिस आयुक्तालयातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी रोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोनाला योग्यरीत्या आतपर्यंत तोंड दिले असून, सध्या एकही पोलिस कोरोनाग्रस्त नाही. यामुळे आता आपण पोलिसांचे सर्व रोगांपासून मुक्ती करण्यासाठी प्रयत्न करत असून, यातूनच जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने सर्वरोगनिदान व उपचार शिबिर झाले. ही शिबिरे आठ दिवसांच्या अंतराने मुख्यालयासह शहरातील सर्व पोलिस वसाहतींत होणार आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक व कर्मचारी उपस्थित

 पोलिस मुख्यालयातील भीष्मराज बाम बहुद्देशीय सभागृहात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आज रोगनिदान शिबिर झाले. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्‌घाटन झाले. मुंबई येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ. दीपनारायण शुक्ला, उपायुक्त अमोल तांबे, संग्रामसिंग निशानदार, विजय खरात, पौर्णिमा चौघुले-श्रींगी, डॉ. भूषण पाटील, डॉ. शंतनू झाल्टे, पोलिस रुग्णालयाचे डॉ. प्रशांत देवरे आदींसह सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com