
शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून वाढता प्रतिसाद लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनकडून किसान एक्स्प्रेस आणि पार्सल गाडीचा विस्तार करण्यात आला आहे.
भुसावळ/नाशिक : शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून वाढता प्रतिसाद लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनकडून किसान एक्स्प्रेस आणि पार्सल गाडीचा विस्तार करण्यात आला आहे.
किसान एक्स्प्रेस आणि पार्सल गाडीचा विस्तार
देवळाली-मुजफ्फरपूर किसान पार्सल गाडी (००१०७ व ००१०८) ही ३१ मार्चपर्यंत चालवण्यात येणार आहे. ही गाडी नाशिक, लासलगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुऱ्हाणपूर, खंडवा या स्थानकांवर थांबेल. सांगोला-मनमाड, सांगोला- शालिमार, सांगोला- शालिमार -सांगोला या किसान पार्सल लिंक गाड्या, तसेच मुंबई-शालिमार- मुंबई पार्सल गाडीही ३१ मार्चपर्यंत चालवण्यात येणार आहे.
हेही वाचा - ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं
व्यापारी, बाजार समिती आणि लोडर्स यांना लाभ
मुंबई-शालिमार- मुंबई पार्सल गाडी नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा या स्थानकावर थांबेल. तसेच, पोरबंदर -शालिमार- पोरबंदर पार्सल गाडीदेखील १ एप्रिलपर्यंत चालवण्यात येणार आहे. ही गाडी भुसावळ, अकोला, बडनेरा येथे थांबेल. किसान एक्स्प्रेस आणि पार्सल गाड्यांना मुदतवाढ देण्यात आल्याने शेतकरी, कार्गो एग्रीग्रेटर, व्यापारी, बाजार समिती आणि लोडर्स यांना त्याचा लाभ होणार आहे. हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ