नाशिकच्या 'या' रक्तपेढीत प्लाझ्मा थेरपीची सुविधा...!

plasma-thearapy.jpg
plasma-thearapy.jpg

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गावर प्लाझ्मा थेरपीची आशापुढे आली आहे. नाशिकच्या या रक्तपेढीत चार अफेरेसीस उपकरणासह प्लाझ्मा थेरपीची सुविधा उपलब्ध झाली आहे. रोगप्रतिकार शक्ती कोरोनापासून बचाव करण्यासाठी महत्वपूर्ण मानली जात आहे.

प्रशिक्षित डॉक्टर आणि तंत्रज्ञ उपलब्ध

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या पेशींची प्रतिकारशक्ती अधिक असल्याचे आढळून आले आहे. म्हणून कोरोनामुक्त झालेल्यांच्या रक्तामधील प्लाझ्मा हा घटक काढून अतिगंभीर रुग्णाला देउन त्यातून कोरोनाबाधित रुग्ण बरा होतो, हे सिद्ध झाले आहे. सरकारने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांकडून कोनव्हॅलेसन्ट प्लाझ्मा दान केल्यास तो रुग्णाला देता येतो, हे स्पष्ट सरकारकडून करण्यात आले आहे. सरकारच्या नियम आणि मार्गदर्शक सूचनांनुसार प्लाझ्मा थेरपी पूर्ण करण्यासाठी अर्पण रक्तपेढीकडे प्रशिक्षित डॉक्टर आणि तंत्रज्ञ उपलब्ध असून आवश्‍यक चाचण्या लवकर केल्या जातील, असे नाशिकच्या अर्पन रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. एन.के. तातेड यांनी स्पष्ट केले.

अफेरेसीस पद्धतीने प्लाझ्मा दान

अर्पण रक्तपेढीमध्ये रक्तदात्यांकडून प्लाझ्मा विशिष्ट पद्धतीने जमा करण्यासाठी वेगवेगळे अफेरेसीस यंत्र उपलब्ध आहेत. यंत्राद्वारे रक्तदात्याचे रक्त हे प्लाझ्मा आणि लाल रक्तपेशी अशा घटकांत विभाजित केले जाते. २०० ते ५०० मिलीग्रॅम प्लाझ्मा वेगळा केला जातो. उरलेल्या लाल रक्तपेशी पुन्हा रक्तदात्याच्या शरीरामध्ये यंत्राद्वारे पाठवल्या जातात. या प्रक्रियेला एक ते दीड तासांचा कालावधी लागतो

कोरोना विषाणू संसर्गावर प्लाझ्मा थेरपीची आशा पुढे आली आहे, कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. - डॉ. एन. के. तातेड ( अध्यक्ष, अर्पन रक्तपेढी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com