नवीन लाल कांद्याच्या भावामध्ये घसरण; घसरणीचा ‘ट्रेंड’ थांबेना!

महेंद्र महाजन
Wednesday, 13 January 2021

लिलावाला सुरवात झाल्यावर कांद्याच्या भावातील घसरणीची स्थिती स्पष्ट झाली होती. मात्र दुपारनंतर मकरसंक्रांतीनिमित्त जिल्ह्यातील काही बाजारपेठा बंद राहणार असल्याची माहिती धडकताच, किलोला एक रुपयाने भावात सुधारणा झाली. मात्र एकुणातील घसरणीचा ‘ट्रेंड’ थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.

नाशिक : कांद्याची निर्यात खुली झाली असली, तरीही मागणी ३० टक्क्यांपर्यंत सीमित राहिली आहे. शिवाय उत्तर भारतासाठी मकरसंक्रांतीनिमित्त असलेल्या मागणीएवढा कांदा पाठविण्याचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. अशातच, नवीन लाल कांद्याच्या भावात क्विटंलला ४०० रुपयांची घसरण झाली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठांमधून गेल्या आठवड्यात सरासरी तीन हजार १०० रुपये क्विंटल भावाने कांद्याची विक्री झालेली असताना मंगळवारी (ता. १२) मात्र शेतकऱ्यांना दोन हजार ७०० रुपयांवर समाधान मानावे लागले. 

नवीन लाल कांद्याच्या भावामध्ये घसरण; घसरणीचा ‘ट्रेंड’ थांबेना!
लिलावाला सुरवात झाल्यावर कांद्याच्या भावातील घसरणीची स्थिती स्पष्ट झाली होती. मात्र दुपारनंतर मकरसंक्रांतीनिमित्त जिल्ह्यातील काही बाजारपेठा बंद राहणार असल्याची माहिती धडकताच, किलोला एक रुपयाने भावात सुधारणा झाली. मात्र एकुणातील घसरणीचा ‘ट्रेंड’ थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. मकरसंक्रांतीसाठी उत्तर भारतातील मागणी कमी होण्याबरोबर निर्यातीचा वेग वाढणे अपेक्षित असताना तसेही घडत नाही. अशातच, गुजरातमधून नवीन कांद्याची आवक वाढली आहे. जिल्ह्यासह महाराष्ट्रातून कांद्याची आवक येत्या आठवडाभरानंतर वाढण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे आगामी भावाची स्थिती काय राहणार? हे सोमवारी (ता. १८) लिलावातून स्पष्ट होईल. मंगळवारी कळवणमध्ये दोन हजार ६५०, सटाण्यात एक हजार ५५०, तर उमराणेत दोन हजार ७०० रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांद्याची विक्री झाली आहे. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा
नवीन कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 

बाजारपेठ मंगळवार (ता. १२) सोमवार (ता. ११) 
पिंपळगाव २ हजार ८५१ २ हजार ९०१ 
मुंगसे २ हजार ८५० २ हजार ९३० 
चांदवड २ हजार ६०० ३ हजार १०० 
मनमाड २ हजार ५०० २ हजार ७०० 
देवळा २ हजार ७२५ ३ हजार २००  

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Falling into price of new red onions nashik marathi news