माणुसकी मेली! "तुम्‍हाला कोरोना झालाय, तुम्‍ही इथं कसे राहता?" शेजाऱ्यालाच लाथाबुक्क्यानी मारहाण

प्रमोद दंडगव्‍हाळ
Friday, 14 August 2020

कुठल्‍याही मोबाईल क्रमांकावर कॉल केल्‍यानंतर गेल्‍या काही महिन्‍यांपासून कोरोना विषाणूविषयक जनजागृती करणारी कॉलर ट्यून ऐकायला मिळते. हमे बिमारी सें लढना हैं, बिमार से नहीं असे सांगत जनजागृती केले जाते आहे. परंतु नाशिकमध्ये माणुसकीवरच प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित करणारा प्रकार घडला आहे.

नाशिक / सिडको : कुठल्‍याही मोबाईल क्रमांकावर कॉल केल्‍यानंतर गेल्‍या काही महिन्‍यांपासून कोरोना विषाणूविषयक जनजागृती करणारी कॉलर ट्यून ऐकायला मिळते. हमे बिमारी सें लढना हैं, बिमार से नहीं असे सांगत जनजागृती केले जाते आहे. परंतु नाशिकच्या सिडको परीसरात माणुसकीवरच प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित करणारा प्रकार घडला आहे. कोरोनाची लागण झाल्‍याच्‍या संशयावरुन एकास त्‍याच्‍या शेजार्याकडून मारहाण व शिविगाळ झाल्‍याचा धक्‍कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. 

हमे बिमारी सें लढना हैं, बिमार से नहीं 
कोरोना बाधित असल्याच्या संशयावरून शेजारी राहणाऱ्या व्‍यक्‍तीने शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील संशयिताविरोधात गुन्‍हा दाखल होताच, पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, सिडकोतील महाले फार्म येथे राहणाऱ्या एका व्यक्तीस त्याच्या शेजारी राहणाऱ्या अप्पा मोतीराम बच्छाव व त्यांची दोन मुले निशांत व प्रशांत पत्नी तसेच दोन्ही सूनांनी वाद घातला. तुम्‍ही कोरोना पॉझिटीव्‍ह आहात, तुम्ही इथे कसे राहतात असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांचा मुलगा निशान त्याने हातातील फरशीचा तुकडा फिर्यादीच्या डोळ्यावर मारुन दुखापत केली असल्‍याचे फिर्यादित म्‍हटले आहे. फिर्यादीचा मुलगा भांडण सोडविण्यास आला असता त्याला देखील मारहाण केली असल्‍याचे नमूद केले आहे.

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

गुन्हा दाखल

कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरून शेजारी राहणाऱ्या इसमाला शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संजय बेडवाल करीत आहेत.

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family attacked on suspected corona patient in Cidco Area Nashik Marathi News